पांचाळे यांच्या गायनास दाद
By Admin | Updated: January 16, 2016 02:43 IST2016-01-16T02:43:36+5:302016-01-16T02:43:36+5:30
गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनास साहित्यरसिकांनी दाद दिली. कै. अण्णा भाऊ साठे सभागृहात सायंकाळी गझल गायनाची मैफल झाली. या वेळी इलाही जमादार व्यासपीठावर होते.

पांचाळे यांच्या गायनास दाद
पिंपरी : गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनास साहित्यरसिकांनी दाद दिली. कै. अण्णा भाऊ साठे सभागृहात सायंकाळी गझल गायनाची मैफल झाली. या वेळी इलाही जमादार व्यासपीठावर होते. पांचाळे यांनी ‘अंदाज आरशाचा वाटे खराखुरा...’, ‘जगण्याला जीवन कळले...’, ‘हे का कुणी फुलांना सांगायला हवे...’, ‘जीवनाला दान द्यावे लागते...’ अशा रचना सादर केल्या. त्यांना गिरीश पाठक (तबला), इकबाल वारसी (व्हायोलिन), जगदीश मिश्री (संवादिनी) यांनी साथ दिली. संदीप वाडकर यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ८८व्या संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील, महाराष्ट्र उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार आदी उपस्थित होते. तसेच ध्वजवंदन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा
डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते
करण्यात आले. (प्रतिनिधी)