शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक व शिस्तबद्ध संचलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 18:47 IST

देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास...

ठळक मुद्देएनडीएचा शिस्तबद्ध दिमाखदार दीक्षांत सोहळासुखोई तसेच जग्वार या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी विशेष आकर्षण जॅग्वार, सुखोई ठरले सोहळ्याचे आकर्षण

पुणे : तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास...अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३५ वा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा शुक्रवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला. अतिशय कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या वेळी अधिकारी व उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुखोई तसेच जग्वार या लढाऊ विमानांनी अधिकारी आणि उपस्थितांना दिलेली सलामी विशेष आकर्षण ठरले. 

भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपिन रावत  या सोहळळ्याचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी  दीक्षांत संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. या वेळी प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल आय. पी. विपीन,  डेप्युटी कमांडंट रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल तसेच लष्करातील उच्चपदस्त अधिकारी आणि छात्रांचे पालक या सोहळळ्यासाठी उपस्थित होते.  संचलनात एकुण २६१ कॅडेट सहभागी झाले होते. यातील १८६ छात्र लष्कराचे, २१ छात्र नौदलाचे आणि ५४ छात्र ह वाईदलातील होते. याशिवाय, अफगाणिस्तान, भूटान, किरगिझस्तान, लेसोवो, टान्झानिया, ताजिकिस्तान, मॉरिशस, व्हियतनाम आणि श्रीलंका या मित्रदेशातील १६ छात्रांचाही समावेश होता. 
यावर्षी तिन्ही दलातून उष्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जसप्रित सिंग या कॅडेटला राष्ट्रपती सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. अ‍ॅकॅडमी कॅडेट परिमल पराशरला राष्ट्रपती रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले. तर स्कॉडर्न कॅडेट कॅप्टन स्वप्निल गुप्ता याला राष्ट्रपती कांस्य पदकाने गौरविण्यात आले.   यावर्षी ‘ द चिफ आॅफ स्टाफ बॅनर’ चॅम्पीयन चार्ली स्कॉडर्न ने पटकावीला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना लष्करप्रमुख रावत म्हणाले,  देशातील सर्वात नोबल प्रोफेशन मध्ये तुम्ही आला आहात. तुमच्या खांद्यावरील तारे तुमच्या कार्याची जाणीव तुम्हाला देत राहिल. तीन वर्षात तुम्ही घेतलेल्या प्रशिक्षणामुळे साहस, नेतृत्वगुण आणि मुल्य तुम्ही शिकला आहात. तुम्ही मिळवले प्राविण्य भविष्यात प्रत्येक आघाडीवर तुम्हाला सक्षम आणि यशस्वी बनवेल.   .....................जॅग्वार, सुखोई ३० विमानांनी विद्यार्थ्यांना दिली मानवंदनाराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३५ वा दिक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी उत्साहात पार पडला. भविष्यातील तिन्ही दलातील 

( फोटो- कपिल पवार )

टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणेBipin Rawatबिपीन रावत