शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

ज्येष्ठ-दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 12:46 IST

मतदानासाठी आल्यानंतर मतदारांना आनंद व समाधान वाटेल याची काळजी घ्यावी...

ठळक मुद्देकेंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना : आगामी विधानसभा निवडणूक कामांचा घेतला आढावा

पुणे : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी तळ मजल्यावर मतदान केंद्र निर्माण करावे, मतदानासाठी आल्यानंतर मतदारांना आनंद व समाधान वाटेल याची काळजी घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींशी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करावी व त्यांच्या सूचना ध्यानात घ्याव्यात. तसेच अडचणीचे वाटणारे मतदान केंद्र बदलून घ्यावे अशी सूचना भारतीय निवडणूक आयोगाचे वरीष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी गुरुवारी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांशी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई येथील मुख्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सिन्हा यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेत प्रशासनाला काही सूचना केल्या. उपनिवडणूक आयुक्त  संदीप सक्सेना, चंद्रभूषण कुमार, महासंचालक (संदेशवाहन आणि समन्वयक) धिरेंद्र ओझा, दिलीप शर्मा व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह उपस्थित होते.पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांबरोबरच विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी निवडणूक अधिकाऱ्यांनी चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी व येत असलेल्या अडचणीबाबत त्यांची मते जाणून घेतली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. तर, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी विभागातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली.पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे मतदान केंद्रांचे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी ते आव्हान असले तरी अशक्य नाही. दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेDivyangदिव्यांगElectionनिवडणूकVotingमतदान