शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Special Report : पुणेकरांना परदेशात जाण्यासाठी जावे लागते दुसऱ्या राज्यात;थेट विमानसेवा कधी होणार सुरु ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:46 IST

केवळ दुबई, सिंगापूर, बँकाॅकसाठीच पुण्यातून थेट विमानसेवा

- अंबादास गवंडीपुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबई, सिंगापूर आणि बँकाॅक या तीनच ठिकाणी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. परंतु, पुण्यातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप देशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पुणेकरांना मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली या शहरातील विमानतळांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे पुण्यातून जाण्यासाठी ‘कनेक्टिंग फ्लाइट’ला प्राधान्य देण्यात येत आहे.

लोहगाव येथील नवीन टर्मिनल सुरू झाले तेव्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढविण्यात येणार आहेत, यासाठी प्रक्रिया सुरू आहे, असे वारंवार विमान प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. परंतु, टर्मिनल सुरू होऊन आठ ते नऊ महिने झाले, तरीही केवळ तीनच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. त्याचा फटका पुणेकर प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे पुण्यातून दैनंदिन १५०० ते २००० प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली या शहरांत जातात. त्यामुळे आर्थिक भारासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

शिवाय पुण्यात जर्मनी, युरोप, फ्रान्स, इटली आणि स्वीडनसह अन्य देशातील आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र टेक ऑफ करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या मर्यादित आहे. शिवाय जी विमान सेवा सुरू आहे, त्यातही काही वेळा उशीर वा विमानच रद्द करण्यात होते. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो.

थेट आंतरराष्ट्रीय सेवा आवश्यक

पुण्यातून दुबई, बँकाॅक आणि सिंगापूरसाठीच तीन आंतरराष्ट्रीय फ्लाइट आहेत. दुबईतून युरोप आणि अमेरिकेत प्रवास करता येऊ शकतो. त्यासाठी दुबई येथून त्याच विमान कंपनीची सेवा असल्यास फायदा होतो; अन्यथा दुबईत गेल्यानंतर प्रवाशांचा कस्टम, इमिग्रेशनसाठी खूप वेळ जातो. त्यामुळे पुण्यातून थेट आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती ट्रॅव्हल्स कंपन्यांनी दिली.

पुण्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे : सिंगापूर, दुबई आणि बँकाॅक

परदेश प्रवास कशासाठी?

नोकरी, व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आणि उद्योग

या देशाला पुणेकरांची पसंती : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान

प्रवासासाठी या शहरांना प्राधान्य : मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चैन्नई आणि दिल्ली

असा लागतो वेळ : (तिकीट दर २७ जून २०२५)

शहर -  वेळ (सरासरी)  -   तिकीट दर (सरासरी)

पुणे - मेलबर्न  -  २३ तास    -  ५८ हजार

मुंबई - मेलबर्न  - १५ तास   -    ४० हजार

मुंबई - वॉशिंग्टन - २४ तास   -    ६५ हजार

पुणे - वॉशिंग्टन   -  २९ तास-  ८० हजार

मुंबई - लंडन - ११ तास -  ३० हजार

पुणे - लंडन -  १८ तास  -  ४५ हजार

युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान येथे नियमित प्रवास करणारा फार मोठा प्रवासी वर्ग पुण्यात व पश्चिम महाराष्ट्रात आहे. पुणे विमानतळाच्या मर्यादांमुळे लांब पल्ल्याची थेट उड्डाणे पुण्यातून शक्य नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अधिक वेळ, श्रम व पैसे खर्च करावे लागतात. मुंबई विमानतळ मार्गेदेखील मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवासी पुणे व पश्चिम महाराष्ट्रातून जात असतात. जड बॅगा घेऊन मध्यरात्री फ्लाईट्स पकडण्यासाठी एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करावा लागतो. यासाठी पुणे विमानतळ प्रशासनाने बंद झालेली पुणे-मुंबई विमान सेवा सुरू केल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकेल. लांब पल्ल्याची थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्यासाठी २०२९ पर्यंत तरी पुरंदर विमानतळ तयार होणे अत्यंत गरजेचे आहे.  - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAirportविमानतळ