‘एसपीव्ही’मध्ये महापौरांना विशेष अधिकार?
By Admin | Updated: April 7, 2016 00:56 IST2016-04-07T00:56:08+5:302016-04-07T00:56:08+5:30
स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही मध्ये महापौरांना विशेष अधिकार देण्याची ग्वाही केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी

‘एसपीव्ही’मध्ये महापौरांना विशेष अधिकार?
पुणे : स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही (स्वतंत्र कंपनी) मध्ये महापौरांना विशेष अधिकार देण्याची ग्वाही केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिल्ली येथे बुधवारी झालेल्या देशभरातील महापौरांच्या परिषदेत दिली. विविध विकासकामांसाठी देशातील महापालिकांनी पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेल स्वीकारावे, असे आवाहनही नायडू यांनी या परिषदेत केले.
महापौर प्रशांत जगताप हे या परिषदेला उपस्थित होते. त्यांनी ही माहिती दिली. देशातील ८८ शहरांचे महापौर परिषदेला उपस्थित होते. त्यातील १० जणांना बोलण्याची संधी मिळाली. त्यात पुणे शहराचा समावेश होता. महापौरांनी या वेळी शहरातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. प्रामख्याने त्यांनी मेट्रो रेल्वेचा विषय उपस्थित केला व लखनौ, कोची या पुण्याच्या तुलनेत लहान असणाऱ्या शहरांना परवानगी मिळाली व पुणे मात्र अद्याप प्रलंबीत आहे, या विषयावर त्वरित बैठक आयोजित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सर्वसाधारण सभेत राजदंड वगैरे पळवून सभेच्या कामकाज व्यत्यय आणण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्याला आळा घालता यावा म्हणून महापालिकेतही विधानसभेप्रमाणे मार्शल प्रणाली आणावी, तसेच महापौरांना
एखाद्या सदस्याला काही काळापुरते निलंबीत करण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी जगताप यांनी परिषदेत केली.
(प्रतिनिधी)