सखी मंच सभासदांसाठी खास लावणी शो

By Admin | Updated: February 16, 2017 03:28 IST2017-02-16T03:28:36+5:302017-02-16T03:28:36+5:30

लोकमत सखी मंचने सभासदांसाठी विभागनिहाय कार्यक्रम घेण्याचे निश्चित

A special Lavani show for Sakhi Forum members | सखी मंच सभासदांसाठी खास लावणी शो

सखी मंच सभासदांसाठी खास लावणी शो

पुणे : लोकमत सखी मंचने सभासदांसाठी विभागनिहाय कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. याअंतर्गत विभागनिहाय कार्यक्रमांना दि. १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.
२० फेब्रुवारी रोजी अभिनेत्री स्मिता शितोळे या सिनेतारका विशेष उपस्थित राहणार आहेत़ सखी मंच सभासदांना हे कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार आहेत. मात्र, सभासदांनी ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. दोन्ही कार्यक्रमस्थळी सखी मंच सभासद नोंदणी चालू असणार आहे. सखी मंचने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचे सहप्रायोजक किवा इंडस्ट्रीज असून होरायझन डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. स्थळ प्रायोजक यश लॉन्स आहेत. सखी मंच सभासदांना ‘किवा इंडिस्ट्रीज’तर्फे २०० रुपयांच्या मूल्यांची सौंदर्यप्रसाधने वितरित करण्यात येतील़
कार्यक्रमस्थळी सभासदनोंदणी सुरू राहणार असून महिलांसाठी वुमेन्स स्पेशल लावणी शो ही एक पर्वणीच आहे़ विशेष कार्यक्रम सभासदांना दिला आहे़ अधिक माहितीसाठी : ०२०-६६८४८५८६ या क्रमांकावर संपर्क करावा.
(प्रतिनिधी)

Web Title: A special Lavani show for Sakhi Forum members