शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विशेष तपासणी मोहिम! अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास 'या' टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 20:49 IST

सणासुदीच्या दिवसांत विक्रीस येणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे

पुणे: गणेशोत्सवात नागरिकांना स्वच्छ व गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने विशेष तपासणी मोहिम हाती घेतली आहे. सणासुदीच्या काळात विक्रीस येणाऱ्या अन्नपदार्थामध्ये भेसळीबाबत काही संशय आढळल्यास नागरिकांनी तत्काळ १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात दि.११ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या तपासणी मोहिमेत आतापर्यंत ३५ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून ६२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. यात प्रसादासाठी लागणारे कच्चे अन्नपदार्थ, मिठाई आदींचा समावेश आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच दोषी आस्थापनांवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली.

सणासुदीच्या दिवसांत विक्रीस येणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. पुणे कार्यालयातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून, आयुक्त अन्न व औषध प्रशासन, मुंबई तसेच सह आयुक्त (पुणे विभाग) यांच्या देखरेखीखाली तपासण्या सुरू आहेत.

प्रसाद वाटपात स्वच्छतेची खबरदारी घेण्याचे गणेश मंडळांना आवाहन

गणेशोत्सवात भाविकांना दिला जाणारा प्रसाद सुरक्षित व स्वच्छ असावा यासाठी गणेश मंडळांनी काटेकोर काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सु. ग. अन्नपुरे यांनी केले आहे. प्रसाद काचेच्या किंवा फूड ग्रेड डब्यात झाकून ठेवावा, शिळे अन्न देऊ नये, प्रसाद वाटणाऱ्या व्यक्तीने हात स्वच्छ धुवावेत, स्वच्छ कपडे, हातमोजे, मास्क व टोपी वापरावी. संसर्गजन्य आजार असलेल्यांनी प्रसाद हाताळू नये. पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करूनच वापरावे, भांडी स्वच्छ धुवून कोरडी ठेवावीत. परिसर स्वच्छ राहावा यासाठी झाकण असलेली कचरा कुंडी ठेवावी. प्रसाद तयार करणाऱ्या सर्व मंडळांनी foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर १०० रुपयांची फी भरून अनिवार्य नोंदणी करून प्रमाणपत्र घ्यावे व परवानाधारक दुकानातूनच कच्चा माल खरेदी करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025foodअन्नfood poisoningअन्नातून विषबाधाGovernmentसरकार