शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

राज्यात सोलापूर जिल्ह्याची विशेष छाप, मुख्यमंत्र्यांचे कौतुकोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 03:29 IST

मुख्यमंत्र्यांचे कौतुकोद्गार : ‘श्रीमंती सोलापूरची’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

पुणे : सोलापूर शहर जिल्हा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. खास करून सोलापूरची खाद्य संस्कृती मला आवडते. सोलापूरचे वस्त्रोद्योग जगभर प्रसिद्ध आहे. यातून सोलापूरची श्रीमंती दिसून येते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे सोलापूर जिल्ह्यातील वस्तूंना सोलापूर बाहेर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आयोजिलेल्या सोलापूर फेस्ट २०१८ चे पुण्यात पंडित फार्म्समध्ये उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी ‘श्रीमंती सोलापूरची’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.सोलापूर जिल्हा कापड उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे व त्याचबरोबर विविध शेती उत्पादने आणि खाद्यपदार्थ यांसाठीही प्रसिद्ध आहे. या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश या सोलापूर फेस्टमध्ये केला आहे.

‘सोलापूर फेस्ट’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुण्यातील नागरिकांना या उत्पादनांची खरेदी करता येणार आहे, तसेच अस्सल सोलापुरी चवीच्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. प्रदर्शनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, गुरुबाबामहाराज औसेकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सोलापूर सोशल फाऊंडेशनचे संचालक अभिजित पाटील, पूर्वा वाघमारे, सल्लागार प्रा. देवानंद चिलवंत, नरेंद्र कानिटकर, प्रमोद साठे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.१०० दालनांतून सोलापूरचा अनुभवसोलापूर फेस्टमध्ये १०० दालनांचा समावेश आहे. सोलापूरची चादर, शेंगा चटणीपासूनमहिला बचत गटाच्या अनेक वस्तू, रेडिमेडकपडे, सेंद्रिय उत्पादने यांसह चित्रकारांच्या कलादालनाचा समावेश आहे.सोलापूर महोत्सवात सामूहिक अग्निहोत्रतीनदिवसीय सोलापूर महोत्सवासाठी डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांना आमंत्रित केले आहे. अग्निहोत्राचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून १७ नोव्हेंबरला सामूहिक अग्निहोत्र होणार आहे. महोत्सवातील तीन दिवस अग्निहोत्रविधीची माहिती व फायदे सांगणारे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस