शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पुण्यात जवानाचे शर्थीचे प्रयत्न आणि श्वान व तिच्या पिल्लांना जीवदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 11:48 IST

गुरुवार पेठेतल्या नाईकवाड्यात ४० फुट खोल विहिरीत एक श्वान पडला असून तिची ५ पिल्ले विहिरीच्या काठावर असल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली.

पुणे : पुण्यातील गुरुवार पेठेतल्या नाईकवाड्यात४० फुट खोल विहिरीत पडलेल्या श्वानाला सुखरुप वाचवत अग्निशामक दलाने तिच्या ५ पिल्लांना त्यांची आई पुन्हा मिळवून दिली. मंगळवारी (दि. ९) दुपारी बारा वाजता सुमारे अर्धा तास हा थरार गुरुवार पेठेतील नाईकवाड्यात अनेकांनी पाहिला आणि अग्निशामक दलाच्या जवानांचे कौतुक केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकवाड्यात ४० फुट खोल विहिरीत एक श्वान पडला असून तिची ५ पिल्ले विहिरीच्या काठावर असल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. अग्निशमन मुख्यालयातून बचाव पथक रवाना झाले. तिथे घटनास्थळी पोहचल्यावर जवानांनी विहिरीमध्ये सुमारे ४० फूट खोल पाण्यामध्ये श्वानाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. लगेचच जवान प्रकाश शेलार यांनी एका मुक्या प्राण्याचा जीव व सोबतच त्या पिल्लांची दशा पाहून दोरीच्या साह्याने खाली विहीरीमधे उतरण्याचे ठरवले. त्यानंतर काहीवेळातच ते चक्क त्या विहिरीमध्ये उतरले. शेलार यांनी त्या पाण्यातील श्वानाच्या जवळ जात भेदरलेल्या श्वानाला दोरीच्या मदतीने योग्य प्रकारे बांधून इतर जवानांना वर ओढण्यास सांगितले व स्वत: शेलार विहिरीतून बाहेर आले. श्वान बाहेर येताच त्या पिल्लांनी त्यांच्या मातेकडे धाव घेत तिला बिलगले. हे मायेचे चित्र पाहून व जवान प्रकाश शेलार यांनी बजावलेल्या तत्परतेचे कौतुक जमलेल्या नागरिकांनी केले.या कामगिरीमध्ये अग्निशमन मुख्यालयातील वाहनचालक नवनाथ मांढरे तसेच जवान प्रकाश कांबळे, शफिक सय्यद, राजेश घडशी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Puneपुणेguruwar pethगुरूवार पेठdogकुत्राfire brigade puneपुणे अग्निशामक दल