शिधापत्रिकेसाठी विशेष शिबिरे

By Admin | Updated: July 5, 2014 23:54 IST2014-07-05T23:54:31+5:302014-07-05T23:54:31+5:30

शिधापत्रिकेतील नावे कमी करणो अथवा नव्याने नावांची नोंद करणो अशा कामांसाठी नागरिकांना वारंवार खेटे घालावे लागत असल्याचे चित्र आहे.

Special camps for ration card | शिधापत्रिकेसाठी विशेष शिबिरे

शिधापत्रिकेसाठी विशेष शिबिरे

पुणो : नवीन शिधापत्रिका मिळविणो, जुनी शिधापत्रिका बदलून घेणो, शिधापत्रिकेतील नावे कमी करणो अथवा नव्याने नावांची नोंद करणो अशा कामांसाठी नागरिकांना वारंवार खेटे घालावे लागत असल्याचे चित्र आहे. त्या पाश्र्वभूमीवर अन्नधान्य वितरण कार्यालयातर्फे (एफडीओ) 31 जुलैर्पयत शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये शिबिर राबविण्यात येत आहे. शहरातील महा-ई-सेवा केंद्रासह 52 ठिकाणी ही शिबिरे घेण्यात येतील. 
नवीन शिधापत्रिका मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी एफडीओ कार्यालयाकडे दाखल झाल्या होत्या. त्या पाश्र्वभूमीवर शहरातील आठ परिमंडळ कार्यालयात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड व निगडी येथे येत्या 17 तारखेर्पयत, कसबा पेठ, मंगळवार पेठ, जुना बाजारासाठी व मंडई, शुक्रवार, गुरुवार व बुधवार पेठ परिसरातील ग कार्यालयात 13 तारखेला शिबिर होईल. ही दोनही शिबिरे शिंपी आळी गुंडाचा गणपती येथे होतील. शिवाजीनगर, कोथरूड, वारजे, उत्तमनगरच्या क परिमंडळ कार्यालयांतर्गत 31 जुलैर्पयत, हडपसर, नाना पेठ, वानवडी, भवानी पेठ येथील ड परिमंडळ कार्यालयात 27, येरवडा चंदननगर, विश्रंतवाडी परिसरातील ई कार्यालयात 2क् जुलै व औंध, सांगवी, भोसरी, लांडेवाडीच्या ‘फ’ कार्यालयात 31 जुलैर्पयत नागरिकांनी संपर्क साधावा. 
 
वेळापत्रकासाठी परिमंडळात साधावा संपर्क 
4धनकवडी, बिबवेवाडी, कात्रज, सिंहगड रस्ता, धायरी परिसरातील परिमंडळ कार्यालयात 12 ते 31 जुलैर्पयत महापालिकेच्या शाळेत शिबिर भरविण्यात येणार आहे. 
4नागरिकांना नवीन शिधापत्रिका देण्याबरोबरच खराब झालेली जुनी शिधापत्रिका बदलून देणो, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणो अथवा नाव नोंदविण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येईल, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी सुचित्र आमले यांनी ही माहिती दिली. 
4शिबिराच्या वेळापत्रकासाठी संबंधित परिमंडळ कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

Web Title: Special camps for ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.