मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST2021-06-19T04:08:15+5:302021-06-19T04:08:15+5:30

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्ययावत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आयोगाने ...

Special campaign for voters without photographs in the electoral roll | मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांसाठी विशेष मोहीम

मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांसाठी विशेष मोहीम

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्ययावत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आयोगाने शंभर टक्के छायाचित्रयुक्त मतदार यादी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील २०६, पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या एकूण ३९९ यादीमध्ये १८ हजार २५६ मतदारांची छायाचित्र मतदारयादीमध्ये दिसून येत नाहीत. या सर्व मतदारांचे छायाचित्र गोळा करण्यासाठी ही मोहीम आहे. यासाठी या छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावाची यादी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका या तीनही संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदारयादीत नाहीत, त्यांनी त्यांचे छायाचित्र रहिवास पुराव्यासह २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय डॉ. हेडगेवार भवन येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आठ दिवसांत जमा करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

ज्या मतदारांची या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत, त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत असल्याचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Special campaign for voters without photographs in the electoral roll