शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयमध्ये आंदोलनाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 04:51 IST

एक वर्ष विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांना गुरुवारी आंदोलनाचे हत्यार उपसले.

पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. या दोन वर्षांपूर्वीच्या आंदोलनाची आठवण करून देणारी ठिणगी पुन्हा संस्थेत पडली आहे. कॅमेरा क्लासरूम नाही, अभ्यासक्रम दिला जात नाही, प्रॅक्टिकल होत नाहीत, कॅमेरे उपलब्ध करून दिले जात नाहीत, मूलभूत सोयीसुविधा नाहीत, याकडे वारंवार लक्ष वेधणाऱ्या सिनेमॅटोग्राफीच्या विद्यार्थ्यांना संचालकांकडून कोणतेच उत्तर मिळत नाही. एक वर्ष विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांना गुरुवारी आंदोलनाचे हत्यार उपसले.आम्हाला आंदोलन करण्याची मुळीच इच्छा नाही. मात्र आमचे जे शैक्षणिक प्रश्न आहेत ते जाणून घेण्यासाठी किमान आमच्याशी संवाद तरी साधा, अशी मागणी विद्यार्थी वारंवार संचालक भूपेंद्र कॅँथोला यांच्याकडे करत आहेत. मात्र दहा विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर संचालक म्हणतात मी केवळ एक किंवा दोन विद्यार्थ्यांशी बोलेन किंवा तुम्ही संबंधित व्यक्तिंशी बोला, असे सांगतात.आम्ही अडचणी पत्रातून सविस्तरपणे मांडल्या आहेत. पण काहीच आश्वासन मिळालेले नाही. विभागप्रमुखांनीही अडचणी सोडविल्या नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढत आहे. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या अडचणी समजून न घेणे, ही वागणूक किती बरोबर आहे, असा उद्विग्न सवाल काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. आम्ही संचालकांना अडचणींचे पत्र दिले आहे. मात्र ते सातत्याने चर्चेचा चेंडू विभागप्रमुखांकडे टोलवत आहेत. आम्हाला संचालकांकडून उत्तरे हवी आहेत. यासाठी आम्हाला आंदोलन करणे भाग पडले.

टॅग्स :FTIIएफटीआयआयagitationआंदोलन