प्रशस्त अंतर्गत रचनाच महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:56+5:302021-05-15T04:10:56+5:30
घरामध्ये माणसाला महत्त्वाचे काय असते? तर त्याला आरामदायी वाटले पाहिजे. नवे तंत्रज्ञान आणि स्वयंचलित वस्तू, सामग्रीचा वापर, फर्निचर ...

प्रशस्त अंतर्गत रचनाच महत्त्वाची
घरामध्ये माणसाला महत्त्वाचे काय असते? तर त्याला आरामदायी वाटले पाहिजे. नवे तंत्रज्ञान आणि स्वयंचलित वस्तू, सामग्रीचा वापर, फर्निचर यांच्या वापराने घर आरामदायी करता येते. घरातील वातावरणाची रचना आणि त्या जागेचा वापर करणाऱ्या लोकांना पुरेसे निरोगी आणि सौंदर्य देणारे वातावरण मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसं घरात जास्तीत जास्त वेळ घालवतात. ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनमानावर आणि आरोग्यावर होतो.
त्यामुळे घराची रचना त्याप्रमाणे करायला हवी. नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. घरात आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांच्यायोगे प्रकाशाचा ताळमेळ साधला गेला पाहिजे. जेव्हा या गोष्टीचा समावेश आराखड्यामध्ये होतो, तेव्हा घराची रचना आदर्श होते. घरामध्ये वावरताना सोईस्कर वाटले पाहिजे. वैयक्तिक स्पर्शभावना महत्त्वाची असते. त्याचा विचारही घराच्या डिझाईनमध्ये करायला हवा.
सिद्धीना साखला