जागा ३९७; अर्ज ६० हजार

By Admin | Updated: March 23, 2017 04:40 IST2017-03-23T04:40:04+5:302017-03-23T04:40:04+5:30

राज्यभरामध्ये बुधवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून पुणे शहर आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, कारागृह

Space 397; Application Form 60 thousand | जागा ३९७; अर्ज ६० हजार

जागा ३९७; अर्ज ६० हजार

पुणे : राज्यभरामध्ये बुधवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून पुणे शहर आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, कारागृह आणि लोहमार्ग विभागातील ३९७ जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी तब्बल ६० हजार तरुणांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाजीनगर मुख्यालय, ग्रामीण पोलीस मुख्यालयासह लोहमार्ग मुख्यालयामध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पोलीस भरतीसाठी राज्यभरामधून आॅनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणांनुसार त्यांना संबंधित केंद्रांवर भरतीसाठी जाण्याचे मेसेज आणि माहिती पाठवण्यात आलेली होती. पुणे शहर आयुक्तालयासाठी एकूण २३९ पदे भरण्यात येणार असून त्यासाठी ३५ हजारांच्यावर अर्ज आलेले आहेत. तर ग्रामीण पोलीस आणि कारागृह पोलिसांची भरती प्रक्रिया एकत्रच राबवली जात आहे. ग्रामीण पोलिसांची ८० आणि कारागृहाच्या ४५ जागांसाठी पाषाण येथील मुख्यालयामध्ये प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी एकूण १६ हजार २४१ अर्ज आले आहेत. तर लोहमार्ग पोलिसांची भरती प्रक्रिया खडकी मुख्यालयात सुरू असून ३३ जागांसाठी साडेआठ हजार अर्ज आले आहेत.
शहरातील भरतीसाठी पहिल्या दिवशी बोलावण्यात आलेल्या १ हजार उमेदवारांपैकी ३४८ जण गैरहजर राहीले. तर ८२ जण अपात्र ठरले आहेत. तर ग्रामीण आणि कारागृह भरतीसाठी आलेल्या ७११ जणांपैकी ६८३ जण पात्र ठरले. तर लोहमार्ग पोलीस दलाच्या भरतीसाठी ३७२ जण उपस्थित राहीले होते.

Web Title: Space 397; Application Form 60 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.