मळद येथे सोयाबीन पिकाविषयक शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:21 IST2021-09-02T04:21:52+5:302021-09-02T04:21:52+5:30

या शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना विविध कीड रोग, कमी पाऊसमान असताना सोयाबीन पिकाची घ्यावयाची काळजी तसेच कृषी विभागाच्या विविध योजना इत्यादीविषयी ...

Soybean Farming School at Malad | मळद येथे सोयाबीन पिकाविषयक शेतीशाळा

मळद येथे सोयाबीन पिकाविषयक शेतीशाळा

या शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना विविध कीड रोग, कमी पाऊसमान असताना सोयाबीन पिकाची घ्यावयाची काळजी तसेच कृषी विभागाच्या विविध योजना इत्यादीविषयी माहिती देऊन उपस्थित शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहायक सांगळे व काजळे यांनी शेतीशाळेची आवश्यकता व महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी कृषी पर्यवेक्षक पी. जी. शिंदे, जे. एन. कुंभार, मंडळ कृषी अधिकारी सी. के. मासाळ, कृषी सहायक सांगळे, काजळे, मळद येथील प्रगतशील शेतकरी गवारे, एकता बचत गटाचे अध्यक्ष प्रशांत शेंडे तसेच प्रल्हाद वरे, शेतकरी उपस्थित होते. या कृषी शाळेचे आयोजन उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

मळद येथे सोयाबीन पिकावरील क्रॉपसॅप योजनेंतर्गत शेतीशाळा पार पडली.

३१०८२०२१-बारामती-०२

Web Title: Soybean Farming School at Malad