पेरणे, थेऊर गणांत राष्ट्रवादीला दिलासा

By Admin | Updated: February 11, 2017 02:45 IST2017-02-11T02:45:02+5:302017-02-11T02:45:02+5:30

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मतदारसंघातील दोन गणांतील महिलांचे अर्ज छाननीत बाद ठरविल्याने राष्ट्रवादी

Sowing relief in Theur Ganantra to NCP | पेरणे, थेऊर गणांत राष्ट्रवादीला दिलासा

पेरणे, थेऊर गणांत राष्ट्रवादीला दिलासा

लोणीकाळभोर/पुणे : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मतदारसंघातील दोन गणांतील महिलांचे अर्ज छाननीत बाद ठरविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता़ मात्र, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असून या दोन्ही महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांना उमेदवारी देण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना
दिला आहे़
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कावेरी कुंजीर (थेऊर गण) व संजीवनी कापरे (पेरणे गण) या दोन्ही महिलांच्या अर्जावर तीनपैकी एका ठिकाणी सही राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत बाद ठरविले होते़ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुद्ध त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली़ अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयदीप वडणे यांच्यासमोर शुक्रवारी या अर्जांवर सुनावणी झाली़ उमेदवारांच्या वतीने अ‍ॅड़ प्रताप परदेशी आणि अ‍ॅड़ सी़ के. भोसले यांनी सांगितले, की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस दिली तरी त्यात तुमचा अर्ज अपुरा आहे, असे म्हटले नव्हते़ त्यांचा आॅनलाईन अर्ज योग्य आहे़ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी करताना कोणती काळजी घ्यायची, याच्या मार्गदर्शक सूचना सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात दिल्या आहेत, त्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले़ न्यायालयाने त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून कावेरी कुंजीर आणि संजीवनी कापरे या दोन्ही महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांना उमेदवारी देण्याचा आदेश दिला आहे़ (वार्ताहर)

Web Title: Sowing relief in Theur Ganantra to NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.