जिल्ह्यात पेरणीची लगबग
By Admin | Updated: June 6, 2015 23:36 IST2015-06-06T23:36:10+5:302015-06-06T23:36:10+5:30
मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून, खरिपातील महत्त्वाचे असलेल्या भात पीक उत्पादकांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.

जिल्ह्यात पेरणीची लगबग
पुणे : मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून, खरिपातील महत्त्वाचे असलेल्या भात पीक उत्पादकांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ७.८८ मि.मी. पाऊस झाला असून, मावळ तालुक्यात ३.१४ मि.मी., भोरमध्ये सर्वाधिक २४.६२ मि.मी., तर शिरूर २१.८८ मि.मी पाऊस झाला. जुन्नर आणि आंबेगावकडे मात्र पावसाने पाठ फिरवली.
खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे ६२ हजार ३00 हेक्टरवर भातपीक घेतले जाते. ९६ हजार ५६५ क्विंटल एवढे सरासरी उत्पन्न मिळते. यंदा ६७ हजार २८४ हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन केले असून, यातून साधारण १ लाख २१ हजार ४३0 क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पावसाच्या अनियमततेमुळे भातउत्पादकांना फटका बसला होता.
साधारण ५५ हजार ५३१ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. त्यातून ६७ हजार ९५ हजार ४४७ क्विंटल उत्पादन मिळाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना भातपिकाने मोठा फटका दिला होता. सुमारे ५0 टक्केही उत्पादन मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांचे
म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने त्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून, भातपेरणीची कामे सुरू
केली आहे. (प्रतिनिधी)