सोनोरी दत्तक घेणार : शिवतारे
By Admin | Updated: October 28, 2015 23:47 IST2015-10-28T23:47:26+5:302015-10-28T23:47:26+5:30
सासवड-सोनोरी रस्त्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच १०० टक्के गावाला पुरंदर उपसाचे पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

सोनोरी दत्तक घेणार : शिवतारे
गराडे : सासवड-सोनोरी रस्त्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच १०० टक्के गावाला पुरंदर उपसाचे पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ यासाठी परिसरात आणखी बंधारे घेतले जातील. तसेच आदर्श गाव योजनेतून सोनोरी दत्तक घेत असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.
सोनोरी (ता. पुरंदर) येथे राज्यमंत्रिपद मिळाल्याबद्दल विजय शिवतारे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार, तसेच साखर कामगार संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी तात्या काळे, गावचे सरपंच सुरेखा काळे, उपसपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी सदस्य, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष, न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल नीलेश काळे यांचा सत्कार राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य दिलीप यादव होते.
या वेळी सरपंच सुरेखा काळे, उपसरपंच नितीन काळे, विकास सोसायटीचे चेअरमन विलास काळे, कृषी सहायक अनिल पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रामभाऊ काळे, आरपीआयचे सासवड शहराध्यक्ष बळीराम सोनवणे, सुरेश अडागळे, गणेश भिंताडे, अंकुश कटके, तेजश्री मानकर, अनिल शिंदे, भारत मोरे, राजाराम काळे व इतर.