सोनसाखळी चोरटे हाताबाहेर
By Admin | Updated: July 7, 2014 23:16 IST2014-07-07T23:16:20+5:302014-07-07T23:16:20+5:30
पादचारी महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याच्या 5 घटना पुणो आणि पिंपरी चिंचवडमध्ये घडल्या. या घटनांमध्ये 3 लाख 75 हजारांचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला.
सोनसाखळी चोरटे हाताबाहेर
पुणो : पादचारी महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याच्या 5 घटना पुणो आणि पिंपरी चिंचवडमध्ये घडल्या. या घटनांमध्ये 3 लाख 75 हजारांचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला. सोनसाखळी चोरटय़ांचा शहरातील उच्छाद पुन्हा सुरू झाला आहे.
कोथरूड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, भुसारी कॉलनीमध्ये राहणा:या 7क् वर्षीय महिला ईरा बिल्डिंगसमोरून मुलीसह पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांची 8क् हजारांची सोन्याची चेन हिसकावली तर वडगाव बुद्रुक येथील विशाल अपार्टमेंटसमोरून जात असलेल्या 4क् वर्षीय महिलेचे 9क् हजारांचे मंगळसूत्र लांबवण्यात आले. ही महिला मूळची नगर जिल्ह्यातील राहाता येथील आहे. ती बहिणीसह पायी जात असताना चोरटय़ांनी मंगळसूत्र हिसकावले.
तर पिंपरीमध्ये 33 वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली. निगडी येथील वसुंधरा सोसायटीमध्ये 56 वर्षीय महिलेचे मंगळसूत्र चोरटय़ांनी लांबवले. यासर्व घटना सकाळी साडेसहा ते दुपारी अडीचच्या दरम्यान घडल्या. (प्रतिनिधी)