मराठा महासंघ शिरूर तालुकाध्यक्षपदी सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST2021-09-19T04:10:09+5:302021-09-19T04:10:09+5:30
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर शहर व तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर ...

मराठा महासंघ शिरूर तालुकाध्यक्षपदी सोनवणे
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर शहर व तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या वेळी पुणे प्रभारी जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड,
प्रभारी महिला जिल्हाध्यक्षा शोभना पाचंगे, प्रभारी युवक जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे यांनी ही निवड जाहीर केली. या बैठकीस सर्व आजी-माजी पदाधिकारी, सभासद व समाजबांधव यांच्या उपस्थितीत होते.
शिरूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
शिरूर तालुकाध्यक्षपदी प्रदीप (आबासाहेब) सखाराम, महिला तालुकाध्यक्षपदी शशिकला विलास काळे, तालुका प्रसिद्धिप्रमुख अनिल सोनवणे, शिरूर तालुका युवक अध्यक्ष गणेश कारभारी-सरोदे, शिरूर तालुका युवती अध्यक्ष प्रियंका दिलीप वाळके,
शिरूर शहर कार्यकारिणी :
अध्यक्ष अनिल किसन डांगे, महिला अध्यक्षा ऊर्मिला राजाराम फलके, शहर युवक अध्यक्ष सचिन भगवान जाधव, शहर युवक सरचिटणीस अनिरुद्ध राखुंडे, शहर युवती अध्यक्ष पूजा विलास पंदरकर यांची निवड करण्यात आली.
180921\img-20210917-wa0054.jpg
अखिल भारतीय मराठा महासंघ शिरुर तालुकाध्यक्षपदी
प्रदिप सोनवणे