सोनसाखळी चोऱ्या निम्म्याने घटल्या
By Admin | Updated: June 6, 2015 23:36 IST2015-06-06T23:36:56+5:302015-06-06T23:36:56+5:30
गेल्या चार वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत

सोनसाखळी चोऱ्या निम्म्याने घटल्या
पिंपरी : गेल्या चार वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गुन्हे तब्बल १५० ने कमी झाले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत सोनसाखळी चोरीचे ३२२ गुन्हे घडलेले होते. परंतु चालु वर्षात मे अखेरीस १७२ गुन्हे घडलेले आहेत. पोलिसांनी यातील ६६ गुन्हे उघडकीस आणून ३१ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली आहे.
रस्त्याने पायी जाणा-या महिलांच्या आणि तरुणींच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी पदभार स्विकारल्यानंतर दुस-याच दिवशी सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकुळ घालायला सुरुवात केली होती.
आयुक्त पाठक यांनी सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करुन हे गुन्हे कमी करण्यासाठी नागपुरमध्ये राबवलेल्या उपाययोजना पुण्यात राबवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पाठक, सह आयुक्त सुनिल रामानंद यांनी
योजना तयार करुन राज्यातील सोनसाखळी चोरी करणा-या ‘इराणी’ चोरट्यांच्या वस्त्यांची माहिती काढली. या माहितीच्या आधारे पथके तयार केली. (प्रतिनिधी)