सोनसाखळी चोरांना महिलांचा चोप

By Admin | Updated: July 23, 2015 04:25 IST2015-07-23T04:25:50+5:302015-07-23T04:25:50+5:30

बहिणीसह शतपावली करण्यासाठी जात असलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात आली. प्रसंगावधान राखत

Sonasakhaal thieves chop women | सोनसाखळी चोरांना महिलांचा चोप

सोनसाखळी चोरांना महिलांचा चोप

पुणे : बहिणीसह शतपावली करण्यासाठी जात असलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात आली. प्रसंगावधान राखत या महिलेने तीन सोनसाखळी चोरट्यांना पकडून चोप द्यायला सुरुवात केली. गर्दी जमा होऊ लागताच, हे तिघेही चोरटे पसार झाले. ही घटना मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावरील श्रीकृष्ण डेअरीसमोर घडली.
याप्रकरणी पीडित महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही महिला जेवण झाल्यानंतर बहिणीसह शतपावली करण्यासाठी चालत जात होती. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. या महिलेने चोरट्यांना पकडून ठेवले.
या दोघींनीही तीन चोरट्यांना पकडून चोप द्यायला सुरुवात केली. या दोन बहिणींचा रूद्रावतार बघून आसपासचे नागरिक घटनास्थळाकडे धावले. लोकांनी मार द्यायला सुरुवात करण्याच्या आतच चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Sonasakhaal thieves chop women