नगराध्यक्षपदी सोनाली मोरे बिनविरोध
By Admin | Updated: December 9, 2015 00:22 IST2015-12-09T00:22:28+5:302015-12-09T00:22:28+5:30
पालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सोनाली दिलीप मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती निवडणूक

नगराध्यक्षपदी सोनाली मोरे बिनविरोध
जेजुरी : पालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सोनाली दिलीप मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती निवडणूक
निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी जाहीर केली. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित होती.
पिठासीन अधिकारी शिंगटे यांनी बारा वाजता औपचारिक निवडीची घोषणा केली. या वेळी पालिकेत भंडारा उधळून व फटाके वाजवून निवडीचा जल्लोष करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष दिलाप बारभाई, उपनगराध्यक्ष लालाअण्णा जगताप, मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरसेवक सुधीर गोडसे,
अविनाश भालेराव, साधना दरेकर, साधना दीडभाई, संगीता जोशी, अमृता घोणे, सुरेखा सोनवणे आदी उपस्थित होते. या वेळी दिलीप बारभाई यांनी मार्गदर्शन केले. मोरे
यांचा पिठासीन अधिकारी शिंगटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)