सोनाली कुलकर्णी सखींना देणार हेल्थ टिप्स
By Admin | Updated: May 20, 2015 01:12 IST2015-05-20T01:12:58+5:302015-05-20T01:12:58+5:30
अत्यंत व्यस्त दिनक्रमामध्येही आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वाचकांना हेल्थ टिप्स देणार आहे.

सोनाली कुलकर्णी सखींना देणार हेल्थ टिप्स
पुणे : अत्यंत व्यस्त दिनक्रमामध्येही आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वाचकांना हेल्थ टिप्स देणार आहे. ‘लोकमत’ व चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘सुदृढ आरोग्य’ या विषयावर २१ मे रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याशी वाचकांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
‘अगं बाई, अरेच्चा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी या उपक्रमात सहभागी होत आहे. ‘हेल्दी वेल्दी, फिटनेस’ या विषयावर ती उपस्थित वाचकांशी संवाद साधणार आहे. वर्ल्ड डे फॉर कल्चरल डायर्व्हसिटी फॉर डायलॉग अॅन्ड डेव्हलपमेंट या दिनानिमित्त हा कार्यक्रम बावधन बु. येथील चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटच्या रुग्णालयात दुपारी ३ वाजता होणार आहे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही या वेळी मिळणार आहे.
हा कार्यक्रम ‘लोकमत’च्या वाचकांसाठी खुला असून, त्यासाठीच्या प्रवेशिका आज (दि. २०) व्हिया व्हिंटेज, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणे येथील ‘लोकमत’च्या कार्यालयात सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध आहेत. प्रवेश सीमित असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावरच प्रवेशिका आणि कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित वाचकांचा लकी ड्रॉही काढण्यात येणार असून, त्यात विजेत्या ठरणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.