शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात मुलानेच केला वडिलांचा खून; पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 15:53 IST

भांडणात मुलाने वडीलांचा गळा आवळून केला खून...

लोणावळा : वडील व मुलगा यांच्यात झालेल्या भांडणानंतर मुलानेच वडिलांचा गळा आवळून खून केला व पलायन केले होते. याबाबत मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पवनानगर विभागातील जवण नं. ३ या गावामध्ये १४ ते १७ जुलै दरम्यान ही घटना घडली होती. या घटनेतील मयत व्यक्ती खंडू ऊर्फ गोट्या भिकाजी गिरंजे (वय ६०, रा. जवण नं. ३, पवनानगर, ता. मावळ) यांची व त्यांचा मुलगा शेखर खंडू ऊर्फ गोट्या गिरंजे (वय ३५, रा. खडकपाडा, कल्याण पश्चिम, जि. ठाणे, मूळ राहणार जवण नं. ३) यांच्यात दारू पिऊन झालेल्या भांडणात शेखर याने वडील खंडू ऊर्फ गोट्या गिरंजे यांचा गळा आवळून खून केला असल्याची फिर्याद सखाराम भिकाजी गिरंजे (वय ६७, रा. जवण नं. ३) यांनी दिली होती.

या फिर्यादीच्या आधारे व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश माने, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पोलीस अंमलदार संतोष शेळके, नितीन कदम, शरद जाधवर, केतन तळपे, संदीप बोराडे, प्रवीण उकिर्डे यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने शेखर यास विश्वासात घेऊन तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश माने पुढील तपास करत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlonavalaलोणावळा