शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

कुठं कारवाई तर कुठं केवळ बॅरिकेडींग, पुण्यातील कडक लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 22:54 IST

प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० ठिकाणी नाकाबंदी केली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाºया मार्गांवर १३ ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत

ठळक मुद्दे प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० ठिकाणी नाकाबंदी केली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाºया मार्गांवर १३ ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत

पिंपरी : अत्यावश्यक सेवेचा पास काढून काही जण दुचाकीवरून डबलसीट तसेच विनामास्क जात असल्याचे लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरातील काही भागात दिसून आले. नाकाबंदीच्या ठिकाणी अशा वाहनचालकांना अडविण्यात येत होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली. मात्र काही ठिकाणी केवळ बॅरिकेडिंग केली होती.

प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० ठिकाणी नाकाबंदी केली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाºया मार्गांवर १३ ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. तेथे शस्त्रधारी पोलीस तसेच महापालिकेचे पथक तैनात आहे. बाहेरून येणाºया वाहनचालकांची त्यांच्याकडून चौकशी केली जात होती. ई-पास तसेच ओळखपत्राची तपासणी करून खातरजमा केली जात होती. मात्र काही ठिकाणी केवळ एक-दोन पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यामुळे वाहनचालक बिनदिक्कत जात होते. त्यांची तपासणी होत नव्हती. पिंपरी येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या कॅम्पमधील शगुन चौक परिसरातील सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे बाजारपेठेच्या या भागात शुकशुकाट होता. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास येथे पोलिसांची केवळ एक गाडी होती. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास पोलिसांचा ताफा येथे दाखल झाला. त्यात ध्वनिक्षेपक असलेली रिक्षा देखील होती. लॉकडाऊनबाबत माहिती देऊन घरातच थांबण्याचे आवाहन त्याव्दारे केले जात होते. 

पुणे येथून पिंपरीकडे येणाºया मार्गावर दापोडी येथे हॅरिस पुलाजवळ चेकपोस्ट उभारून नाकाबंदी करण्यात आली होती. तेथे महापालिका कर्मचारी, वाहतूक विभागाचे कर्मचारी, होमगार्ड व पोलीस असे संयुक्त पथक होते. मास्क न लावलेल्या वाहनचालकांवर कारवाई केली जात होती. त्यांना ५०० रुपये दंडाची पावती दिली जात होती. दुपारी एकपर्यंत १० जणांना दंड केला होता. तर पास किंवा ओळखपत्र नसलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये खटले दाखल केले जात होते. दुपारी एकपर्यंत आठ खटले दाखल केले होते. वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहनचालकांना फिरण्याचे कारण विचारत होते. कासारवाडी येथील नाशिक फाटा येथे बॅरिकेटड्स लावण्यात आले होते. मात्र पोलिसांकडून तपासणी होत नव्हती. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असल्याने वाहनचालक त्याचे पालन करून स्वयंशिस्त पाळत होते. 

भोसरी येथे उड्डाणपुलाखाली बीआरटीएस टर्मिनस जवळ नाकाबंदी होती. तेथे पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात होती. बहुतांश वाहनचालकांजवळ ओळखपत्र तसेच इ-पास होते. मात्र काही वाहनचालकांकडे सबळ कागदपत्रे नसल्याने त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास देखील मोठ्या संख्येने येथे वाहनांची ये-जा सुरू होती. मोशी येथील टोलनाक्यावर भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून नाकाबंदी केली होती. चाकणकडून येणाºया वाहनांची येथे तपासणी केली जात होती. दुपारची वेळ असूनही येथे वाहनांची मोठी ये-जा होती. दोनच्या सुमारास देखील पोलीस भर रस्त्यात थांबून वाहनांची तपासणी करीत होते. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील केले जात होते.  

दुचाकीवर पोलीस लिहिल्याने संशयदुपारी दोनच्या सुमारास येथून जाणाºया एका दुचाकीस्वाराचा संशय पोलिसांना आला. दुचाकीवर पोलीस लिहून तसेच पोलिसांचा लोगो लावून तो जात होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. तो किंवा त्याच्या कुटुंबात कोणीही पोलीस नसल्याचे समोर आले. काही रोकड तसेच इतर कागदपत्रे त्याच्याकडे मिळून आली. मात्र ती रक्कम एटीएममधून काढून तो त्याच्या बायकोला भेटण्यासाठी तिच्या माहेरी जात असल्याचे त्याने सांगितले. तसेच एटीएममधून रोकड काढल्याचे पुरावेही सादर केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड