शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra lockdown Pune rules पुणेकरांना काहीसा दिलासा. आता काय काय राहणार सुरू पाहा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 19:37 IST

राज्या पाठोपाठ पुण्यासाठी नवीन नियमावली जाहीर

राज्य सरकार पाठोपाठ पुणे महापालिकेने सुद्धा सुधारित आदेश काढत आणखी काही सुविधांना शहरात परवानगी दिली आहे. आधीच्या आदेशानुसार अनेक अत्यावश्यक सेवा मध्ये मोडणाऱ्या  सेवांना परवानगी देण्यात आली नव्हती. पण आता मात्र त्या सेवांचा समावेश नव्या आदेशात करण्यात आलेला आहे. या सेवांना सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये सुविधा पुरवता येतील तर काही अत्यावश्यक सेवांना पूर्णवेळ सुरू राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. 

नव्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेमध्ये पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, कुरिअर सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्विस प्रोव्हायडर, माहिती-तंत्रज्ञान यांच्याशी निगडित सेवा देणाऱ्या कंपन्या, सुरक्षा सेवा, फळ विक्रेते , नॉनव्हेज ची दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, पेट शॉप, पाळीव प्राणी संगोपन केंद्र यांचा समावेश करण्यात आला आहे. 

याबरोबरच खासगी कार्यालयांमध्ये परवानगी असणाऱ्या कार्यालयांमध्ये सेबीची सर्व कार्यालय, रिझर्व बँकेची संबंधित संस्था, वित्तीय महामंडळे, कस्टम हाऊस एजंट औषधे औषधांची संबंधित वाहतूक करणारी परवानाधारक ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, मायक्रो फायनान्स संस्था यांना सर्व दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळात त्यांची कार्यालय चालू ठेवता येतील.

अधिकृत तिकीट असलेल्या नागरिकांना घरातून स्थानकापर्यंत तसेच स्थानकापासून घरापर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. याला वेळेचे कोणतेही बंधन नाही.

औद्योगिक कंपन्यांची खासगी बसेस आणि वाहने यांना संचार बंदीच्या काळात प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.

धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी याठिकाणी पूजा-अर्चा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी विवाह किंवा अंत्यविधी संबंधित कार्यक्रमास मर्यादित लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाण्याची मुभा नवीन नियमावली मध्ये देण्यात आलेली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना शाळा-कॉलेजमध्ये जाता येईल.

लग्नकार्यासाठी आता पोलिसांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

खाजगी वाहने आणि खासगी बसेस यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळात परवानगी देण्यात आली आहे मात्र आमच्या काळात खासगी वाहनांना रस्त्यावरती प्रवेश मिळणार नाही. 

बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा या नव्या नियमावलीत दिलासा देण्यात आलेला आहे. बांधकाम व्यावसायिकांचे साईट ऑफिस तसेच आर्किटेक्टचे ऑफिस आता सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरु राहू शकेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका