वाहतूक समस्या कायमची सोडवू
By Admin | Updated: February 14, 2017 02:20 IST2017-02-14T02:20:57+5:302017-02-14T02:20:57+5:30
भाजपा व शिवसेनेने विरोध केलेल्या ससाणेनगरच्या रेल्वे क्रॉसिंंगचा भुयारी मार्ग तसेच मंत्री मार्केट ते काळेबोराटेनगर रस्त्याचे काम त्वरित

वाहतूक समस्या कायमची सोडवू
हडपसर : भाजपा व शिवसेनेने विरोध केलेल्या ससाणेनगरच्या रेल्वे क्रॉसिंंगचा भुयारी मार्ग तसेच मंत्री मार्केट ते काळेबोराटेनगर रस्त्याचे काम त्वरित चालू करून ससाणेनगर, काळेबोराटेनगर परिसराची वाहतूक समस्या कायमची सोडविण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दिले.
हडपसर गावठाण-सातववाडी प्रभाग क्रमांक २३ या परिसरातील काळेबोराटेनगर व परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार योगेश ससाणे, वैशाली बनकर, विजय मोरे, राजलक्ष्मी भोसले यांच्यासह अविनाश काळे, योगेश जगताप, दीपक काळे, चाँद शेख, गोपीनाथ पवार उपस्थित होते.
स.नं. २९ ससाणेनगर येथे इंग्लिश मीडियम स्कूल, हडपसरच्या वेशीचे सुशोभीकरण करून त्यावर शिवाजीमहाराजांचा पुतळा बसवणार, डांगमाळी मळा येथील वलय सोसायटी पुढील रस्त्याचे सिमेंटीकरण करून तेथील दुरवस्था होऊन बंद झालेली जिम व जलतरण तलाव चालू करणार असल्याचे
आश्वासन दिले. या परिसराचा विकास राष्ट्रवादी पक्षानेच केला आहे. या परिसराचे अजून नंदनवन करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या चारही उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन उमेदवारांनी केले.