शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वाहतूक समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:59 IST

पाटील यांची सूचना : जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक

पुणे : वाहनांची वाढती संख्या, अपूरे रस्ते यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. सर्व संबधित यंत्रणांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात व वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बुधवारी दिल्या.

शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, परिसर संरक्षण संवर्धन समितीचे अध्यक्ष रणजीत गाडगीळ, ग्राहक सेवा संस्थेचे धनंजय वाठारकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून पादचाठयांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना करावी, असे अनिल शिरोळे यांनी सांगितले. तर रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निदेर्शाचे पालन संबधित यंत्रणांना प्राधान्याने करावे, अशी सूचना खासदार अमर साबळे यांनी केली.पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील ब्लॅॅक स्पॉटसंबधी उपाययोजना करणे, राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव महामार्गावरील वाहतूक समस्या सोडविणे, वाहतूककोंडी टाळण्यासाठी स्वयंसेवकांची अतिरिक्त कुमक नेमणे, रस्त्यावरील दिशादर्शक व रिफ्लेक्टर्सची दुरुस्ती करणे, महामार्गावरील खड्डयांची दुरुस्ती करणे, रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक समस्या सोडविणे, पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक असुविधा दूर करणे आदी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्व संबधित यंत्रणांनी ताळमेळ ठेवून वाहतूकीच्या समस्या दूर कराव्यात, अशा सूचना दिल्या.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPuneपुणे