शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मरणाच्या दारातून वाचविण्याचे समाधान मोठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 01:27 IST

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्तांना मदतीचा हात : पूजा साठीलकरचा तरुणाईपुढे वेगळा आदर्श

युगंधर ताजणे पुणे : जिथे रक्ताच्या नात्याची किंमत फारशी उरलेली नसताना दुसरीकडे मोठ्या आपुलकी आणि कर्तव्यदक्ष भावनेतून वेळ आणि प्रसंग कुठला असेना त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचे, हे तत्त्व पूजा साठीलकर ही युवती अमलात आणते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील व्यक्तींना तातडीने मदत करणे, त्यांना रुग्णालयात पोहोचविण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने उभारण्याचे काम ती आनंदाने करते. ‘एखाद्या व्यक्तीला मरणाच्या दारातून परत आणून वाचविण्याच्या समाधानाचे मोल मोठे असते,’ या शब्दांत ती आपल्यावरील जबाबदारीची जाणीव करून देते.

सिव्हील इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर पूजाने दीड वर्ष एका कंपनीत नोकरी केली; मात्र त्यात तिचे मन काही रमले नाही. पुढे इंटेरियर डेकोरेटरचा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. वडील गुरुनाथ रामचंद्र साठीलकर यांच्या मदतशील स्वभावाचा प्रभाव पूजावर पडला. वडिलांनी सुरू केलेल्या ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था’ या नावाने एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ती सहभागी झाली. त्यात रोज येणाºया अपघातांची माहिती घेऊन घटनास्थळी धाव घेणे, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे काम ती करू लागली. याकामी तिला तिचा भाऊ शुभम, बहीण भक्ती आणि आई यांची मोठी मदत झाली. या संस्थेकडे ३ रुग्णवाहिका असून त्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील कुठल्याही परिसरात अपघात झाल्यास अपघातस्थळी दाखल होतात. अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणे, हा एकमेव उद्देश मनाशी बाळगून ९४ किलोमीटर असलेल्या महामार्गाच्या परिसरात प्रभावीपणे या संस्थेतर्फे काम केले जाते. सध्याच्या सोशल माध्यमांच्या युगात एकमेकांशी यांत्रिकरीत्या संवाद साधण्याची सवय होऊन बसलेल्या पिढीला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचे काम पूजा करते. ती म्हणते, ‘‘महामार्गावर अपघात घडल्यानंतर घटनास्थळी रक्त पाहिल्यावर अनेक जण घाबरून जातात. तर, पोलीस कारवाई करतील, या भीतीपोटी अनेकांची गाळण उडते. आपल्यासमोर मरणासन्न अवस्थेत पडलेला व्यक्ती ज्या वेळी मदतीची याचना करते, तेव्हा त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याची जबाबदारी तरुणांनी घ्यायला हवी.’’पूजाचे वडील गुरुनाथ साठीलकर यांनी सांगितले, ‘‘केवळ अपघातापुरते संस्थेचे काम मर्यादित नाही; इतरही कामे केली जातात.’’नुसतेच फोटो काढण्यासाठी गर्दी नको...तरुणाई आता नुसतीच मोबाईलमध्ये फोटो काढण्यात व्यस्त असते. आपल्यासमोर झालेल्या अपघातात आपल्याच घरातील असतील, याची शाश्वती आज देता येणार नाही. कपडे, हात, खराब होतील, पोलीस त्रस्त करतील म्हणून कुणाला मदत नाकारू नका. जो प्रसंग त्यांच्यावर आला आहे, तो उद्या तुमच्यावरसुद्धा येऊ शकतो याचे स्मरण तरुणांनी ठेवण्याची गरज आहे.- पूजा साठीलकर 

टॅग्स :Puneपुणे