शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

एकपात्री प्रयोग म्हणजे परकाया प्रवेश : डॉ. नीलेश साबळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 19:07 IST

राम नगरकरांसारख्या एकपात्री कलाकाराने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसविले. कारण त्यांचा विनोद हा निरागस विनोद होता..

ठळक मुद्देराम नगरकर कला गौरव पुरस्कार डॉ. नीलेश साबळे यांना सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान

पुणे:- एकपात्री प्रयोग हे दुसरे-तिसरे काही नसून, परकाया प्रवेशाचाच अनुभव असतो. तुम्हाला त्यातील पात्रं अंगात भिनवावे लागते, पचवावे लागते, त्याच्याशी एकरुप व्हावे लागते, तेव्हाच ते रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते,अशा शब्दांत प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निवेदक, अभिनेता डॉ. नीलेश साबळे यांनी एकपात्री कलाकाराचे विश्व उलगडले. राम नगरकर कला अकादमीतर्फे देण्यात येणारा राम नगरकर कला गौरव पुरस्कार  डॉ. नीलेश साबळे यांना ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि लीड मीडियाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सातव, तसेच राम नगरकर कला अकादमी,पुणेचे अध्यक्ष वंदन राम नगरकर, उपाध्यक्ष उदय राम नगरकर, सचिव संध्या नगरकर-वाघमारे, सहसचिव मंदा नगरकर-हेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.राम नगरकरांसारख्या एकपात्री कलाकाराने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसविले. कारण त्यांचा विनोद हा निरागस विनोद होता आणि निरागस विनोद रसिकांना भावतो. भोर, सासवडहून सुरू झालेल्या माझ्या प्रवासात राम नगरकरांच्या हऱ्या नाऱ्या झिंदाबाद, विच्छा माझी पुरी करा या नाटकांनी सोबत केली. राम नगरकरांच्या सादरीकरणाचा माझ्यावर प्रभाव असल्याची भावना डॉ. साबळे यांनी व्यक्त केली.  मी गडहिंग्लजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना सांस्कृतिक विभागाचा प्रमुख झालो. कारण सुरुवातीपासूनच शुटिंग, कलाकार याविषयी मला खूप आकर्षण होते. या क्षेत्रामध्येच काहीतरी करून दाखविण्याची उर्मी मला शांत बसू देत नव्हती. रंगमंचावर वावरण्यासाठी एकपात्री हे माध्यम मी निवडले, त्यावेळी या क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींचा अभ्यास करू लागलो. त्यात राम नगरकरांचे स्थान प्रामुख्याने प्रथम स्थानावर येते. राम नगरकरांचे लेखन जणू माझ्या साठीच होते, अशा पद्धतीने मी गावोगावी त्याचे एकपात्री प्रयोग करू लागलो. आजही माझे आई-वडील, माझे कुटुंब हे माझे प्रेक्षक असतात. त्यांना माझा कार्यक्रम आवडला, तर तो संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल, याची खात्री मला मिळते असेही ते म्हणाले.सुधीर गाडगीळ यांनी सध्या सूत्रसंचालन करीत असलेल्या प्रसिद्ध कार्यक्रमात पुरूषांना स्त्रियांचा वेश घालून कला सादर करण्याचे प्रमाण कमी केल्यास सर्व स्तरातील प्रेक्षकांचे प्रेम त्यांना मिळेल, असा खास पुणेरी शैलीत प्रेमळ सल्ला नीलेश साबळे यांना यावेळी दिला.प्रास्ताविक वंदन राम नगरकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेJokesविनोद