सॉलिटेअर, अर्जुन चॅरिटेबल ट्रस्ट; अडचणीच्या काळात गरजूंना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:22+5:302021-09-06T04:15:22+5:30

समाजाचे काम हातात घेतल्यावर त्याला सातत्याने सकारात्मक ऊर्जा देण्यात सॉलिटेअर ग्रुप व अर्जुन चॅरिटेबल ट्रस्टने आदर्श घेण्यासारखे काम केले ...

Solitaire, Arjun Charitable Trust; A helping hand to those in need in times of difficulty | सॉलिटेअर, अर्जुन चॅरिटेबल ट्रस्ट; अडचणीच्या काळात गरजूंना मदतीचा हात

सॉलिटेअर, अर्जुन चॅरिटेबल ट्रस्ट; अडचणीच्या काळात गरजूंना मदतीचा हात

समाजाचे काम हातात घेतल्यावर त्याला सातत्याने सकारात्मक ऊर्जा देण्यात सॉलिटेअर ग्रुप व अर्जुन चॅरिटेबल ट्रस्टने आदर्श घेण्यासारखे काम केले आहे. हल्लीच्या काळात सर्वांवर अनेक प्रकारे झालेल्या विपत्तीची जाणीव प्रत्येकाला आहे. या काळात सॉलिटेअर ग्रुप व चोरडिया ग्रुपच्या माध्यमातून समाजाला अडचणीत मदत करण्याचे काम सुरु होते.

जेवण तयार करण्यापासून ते त्याचे वाटप करण्यापर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आणि ह्या सगळ्या कार्यामध्ये जिथे कुठे गरज पडत असे अशा ठिकाणी पोलीस खात्याने व त्यांच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन मदत केली. जेवण, पाणी, उपयोगी वस्तूंचे वाटप पूरग्रस्तांना केले आहे. वेळोवेळी मदत करण्यासोबत महाबळेश्वर येथील लोकांना छोटे-छोटे गृहउद्योग सुरु करण्यासाठी योग्य मार्गदर्शन तसेच त्यासाठी लागणारी मदत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कोरोनाच्या अतिशय कठीण काळामध्ये स्वतःची चिंता न करता जनतेची सेवा करणाऱ्या पोलिस बांधवासाठी १,००,००० मास्क, १५० लिटर सॅनिटायझर, १,००,००० पेक्षा जास्त व्हिटॅमिन 'सी' च्या गोळ्या, २५,००० हॅन्ड ग्लोव्हज आणि १५० ऑक्सिमीटर दिले. संसाधने असूनसुद्धा बाहेर न पडता येण्यामुळे जे लोक अडचणीत होते, त्यांनासुद्धा ट्रस्टकडून मदत केली गेली.

लॉकडाउनच्या काळात शहरातील सेक्स वर्कर अडचणीत आलेले, त्यावेळी पुणे पोलीस उपायुक्तांच्या सहकार्याने ९०० फूड हॅम्परचे वाटप केले गेले. २०२० मध्ये कोकणात २०० फूड हॅम्परचे वाटप केले. भूगाव येथील मतिमंद मुलांसाठी अन्नधान्य आणि मॅट्रेसेस दिले. पूर्णतः पर्यटनावर अवलंबून असलेल्या महाबळेश्वरच्या लोकांना पहिल्या व दुसऱ्या लाटेत मदत म्हणून व्हिटॅमिन ''सी'' च्या गोळ्या तसेच ६००० मास्कचे मोफत वाटप केले. जेव्हा वैद्यकीय संसाधनांसोबत पीपीई किटची खरी गरज भासत होती. त्या वेळेस चांगल्या दर्जाचे १५ ते १६ हजार किट विविध ठिकाणी ट्रस्टकडून वाटप केले गेले. पाठवलेली मदत गरजू लोकांपर्यंत सफलतापूर्वक पोहचत असल्याची खात्री करून घेण्यात सुद्धा पोलीस आणि इतर सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे होते. सॉलिटेअर ग्रुप व अर्जुन ट्रस्ट च्या माध्यमातून लवकरच एक अनाथ आश्रम सुरु करणे विचाराधीन आहे.

ह्या संपूर्ण वृत्तांतावरून युवकांनी आणि सर्वसाधारण लोकांनी हे समजले पाहिजे की समाजकार्य करण्याकरिता संसाधनांपेक्षा निर्णय, समर्पण आणि दृढ निश्चयाची गरज आहे. ते असल्यामुळे आपण गरजेच्या काळात सातत्याने एकमेकांची मदत करू शकतो आणि ज्या ठिकाणी संसाधनांची आणि मार्गदर्शनाची गरज पडेल त्या परिस्थितीत अर्जुन चॅरिटेबल ट्रस्ट व सॉलिटेअर ग्रुप तसेच समविचारी व्यक्तिमत्त्व सदैव आपल्या साहाय्यतेसाठी उपस्थित राहतील.

- अशोक धनराज चोरडिया

Web Title: Solitaire, Arjun Charitable Trust; A helping hand to those in need in times of difficulty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.