शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील देशाची सुरक्षाव्यवस्था न सोडता जवान करणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:52 IST

निवडणूक आयोग : जवानांसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतपत्रिका पाठविणार

- राहुल शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशाच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावणाऱ्या सीमेवरील सैनिकांना वेळेवर मतपत्रिका न पोहोचल्याने अनेकदा मतदानाचा हक्क बजावता येत नाही. मतदानासाठी चार दिवसांची सुटी काढणेही अनेकदा शक्य होत नाही. या जवानांसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतपत्रिका पाठविण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. यामुळे मतदानासाठी सीमा सोडून परतण्याची गरज आता उरलेली नाही.

पुण्यातल्या सी-डॅक संस्थेच्या मदतीने निवडणूक आयोगाने विशेष प्रणाली तयार केली आहे. त्याद्वारे जवानांच्या मोबाईलवर इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका पाठविली जाणार आहे. यामुळे पोस्टाने मतपत्रिका पाठविण्यात जाणारा वेळ वाचणार असून प्रत्येक सैनिक मतदानाचा करू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सेवेमुळे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावू न शकणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना आणि सीमेवरील जवानांना सध्या पोस्टल मतदानाचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.

निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी एकाच जिल्ह्यात असल्याने पारंपरिक पद्धतीने पोस्टल मतदान करणे त्यांना शक्य होते. परंतु, सीमेवर तैनात जवानांना पोस्टल पद्धतीने मतदान करण्यात अनेक अडचणी येतात.पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठविणे आणि पोस्टाकडून ही मतपत्रिका परत मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यात बराच कालावधी जातो. मतमोजणीच्या तारखेपर्यंत मतपत्रिका मतदान केंद्रापर्यंत न पोहोचल्याच्या घटना अनेकदा घडतात. त्यामुळे इलेक्टॉनिक पद्धतीने मतपत्रिका पाठविण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

या प्रत्येक मतपत्रिकेला बारकोड असणार आहे. पोस्टाद्वारे येणाºया पाकिटावरही बारकोड दिला जाईल. सी-डॅकच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका सैनिकांच्या मोबाईलवर पाठविली जाईल. मोबाईलवर पीन नंबर (युनिक कोड) दिला जाणार असल्याने बोगस मतदान होणार नाही.मोबाईलवर पाठविलेली इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका संबंधित जवान मतदाराला डाऊनलोड करून घेता येईल. इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकेद्वारे मतदान करणारा मतदार तोच आहे, याबाबतच्या खात्रीसाठी सक्षम अधिकाºयाकडून घोषणापत्र घेतले जाईल.या घोषणापत्रावरही बारकोड असले. त्यामुळे या मतपत्रिकांची मोजणी करताना अडचण येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.लाभ कोणालापोस्टल किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणाºया मतदानासाठी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांची नोडल आॅफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. जवान व त्यांच्या पत्नीला इलेक्ट्रॉनिक मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. पुणे जिल्ह्यात असे ४ हजार ७५८ मतदार आहेत. लष्करातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, सीआरपीएफचे जवान, एसआरपीएफचे जवान यांचा यात समावेश आहे. 

सैनिकांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर अंतिम मतपत्रिका तयार होते. त्यानंतर ‘पोस्टल बॅलेट जनरेट’ सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार झालेली इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका सी-डॅकच्या मदतीने पाठविली जाईल.- सुनील गाडे, उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान