शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जवानांची शौर्यगाथा लवकरच अभ्यासक्रमात; लष्करप्रमुख बिपीन रावत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 19:12 IST

वीर जवानांवरील पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात येणार आहे. वर्षभरात केंद्रीय विद्यालयाच्या अभ्यासक्रमात या  पुस्तकाचा समावेश होईल, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली.

ठळक मुद्देलष्करातील जवानांसाठी भेटवस्तू तसेच कार्ड पाठवणार्‍या १४ शाळा व शिक्षकांचा सत्कारआतापर्यंत २०० विद्यालयांतील अभ्यासक्रमात वीरांच्या माहितीचा समावेश

पुणे : भारतीय जवानांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी वीर जवानांवरील पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात येणार आहे. याबाबत मानव संसाधन मंत्रालयाशी चर्चा सुरू असून, वर्षभरात केंद्रीय विद्यालयाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश होईल, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. बी. एन. श्रीवास्तव फाउंडेशनला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातील धन्वंतरी सभागृहात लष्करातील जवानांसाठी भेटवस्तू तसेच कार्ड पाठवणार्‍या १४ शाळांचा व शिक्षकांचा सत्कार रावत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.  याप्रसंगी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे उपस्थित होते. रावत म्हणाले, ‘‘देशाचे रक्षण करताना अनेक जवानांनी बलिदान दिले आहे. त्यांची माहिती विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात व्हावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत २०० विद्यालयांतील अभ्यासक्रमात वीरांच्या माहितीचा समावेश केला आहे.’’भारतीय जवानांना भेटवस्तू तसेच राख्या पाठवण्याचे बी. एन. श्रीवास्तव फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे, असे सांगून रावत म्हणाले, ‘‘भारतीय लष्करातील जवान हा सीमेवर लढत असतो. २४ तास तो आपले कर्तव्य बजावत असतो. अशा वेळी विद्यार्थ्यांनी पाठवलेली शुभेच्छापत्रे तसेच राख्यांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. एखादा सण साजरा करण्यासाठी कर्तव्यामुळे जवानाला घरी जाता येत नाही. अशा वेळी या विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या भेटवस्तूंमुळे देश आपल्या पाठीशी आहे, ही जाणीव या भेटवस्तूंमुळे जवानांमध्ये वाढते. भारतीय सैन्यदल हे धर्मनिरपेक्ष सैन्यदल आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी भेटवस्तू पाठवताना विविध भाषांचा वापर करत त्यांच्या कल्पनेला वाव द्यावा, असे आवाहनही रावत यांनी विद्यार्थ्यांना केले. या वेळी भारतीय जवानांना जवळपास ७ हजार शुभेच्छापत्रे पाठवण्याचा विक्रम केलेल्या पुण्यातील डीएव्ही स्कूलला ‘फिल्ड मार्शल सॅम मानिकशॉ’ ही फिरती ट्रॉफी रावत यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. 

काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करातर्फे आॅल आऊट मोहीम राबविण्यात आहे. मात्र, ही समस्या चर्चेने सोडवण्यासाठी केंद्र सरकारने माजी आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली आहे. यावर रावत म्हणाले, ‘काश्मीर प्रश्न  सोडवण्यासाठी चर्चेद्वारे ते प्रयत्न करतील, लष्कर मात्र आपले काम सुरूच ठेवेल.’ 

 

भारत-चीन सीमेवर शांतताडोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. सीमेवर सध्या शांतता असल्याचे कार्यक्रमानंतर रावत यांनी पत्रकारांना सांगितले.

 

एल्फिन्स्टनचा ब्रीज लष्करच बांधणारचेंगराचेंगरीची दुर्घटना झालेल्या एल्फिन्स्टन रोड तसेच करी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील नवे पादचारी पूल ब्रीज लष्कर बांधणार आहे. यावरून सध्या वाद  सुरू आहे. याबाबत रावत यांना विचारले असता ते म्हणाले, एल्फिन्स्टन येथील पूल बांधण्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होईल. चेंगराचेंगरीसारख्या घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी या पुलांचे काम पूर्ण करण्यात येईल. या नंतर लष्करामार्फतच या पुलांचे काम पूर्ण केल्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होईल. 

टॅग्स :Soldierसैनिकeducationशैक्षणिक