सोलापुरातील युवकाची पुण्यातील वाल्हेत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:19 PM2018-01-18T13:19:40+5:302018-01-18T13:21:07+5:30

वाल्हेनजीक पवारवाडीच्या हद्दीतील शेतामध्ये सोलापूरमधील विश्वनाथ श्रीमंत गंगा (वय ३५) या युवकाने झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.

Solapur's youth Suicides in Walhe, Pune, reason unclear | सोलापुरातील युवकाची पुण्यातील वाल्हेत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

सोलापुरातील युवकाची पुण्यातील वाल्हेत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

googlenewsNext

पुणे : वाल्हेनजीक पवारवाडीच्या हद्दीतील शेतामध्ये सोलापूरमधील विश्वनाथ श्रीमंत गंगा (वय ३५) या युवकाने झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.
पवारवाडीतील शेतकरी भगवान शंकर पवार हे सकाळी आपल्या शेताकडे जात असताना एकनाथ रामभाऊ पवार यांच्या शेतातील झाडाला गळफास घेतलेली एक अनोळखी व्यक्ती दिसली. बाजूलाच एम एच १३ एएम ६९८५ नंबरची मोटार सायकल ही दिसली असता या शेतकऱ्याने वाल्हे येथील पोलीस चौकीशी संपर्क साधला व माहिती दिली. वाल्हे दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार पोलीस मित्रासोबत घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता ही व्यक्ती विश्वनाथ श्रीमंत गंगा (रा. अमरनाथ नगर, शेमटी प्लॉट नं. १६, सोलापूर) असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पवार करीत आहेत.

Web Title: Solapur's youth Suicides in Walhe, Pune, reason unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे