सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पार्किंग वादातून खून, कोंढव्यातील घटना : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 06:54 AM2018-01-22T06:54:56+5:302018-01-22T06:55:05+5:30

लुल्लानगरमधील बंगला नंबर ६७ समोरील सार्वजनिक रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

 Software engineer's murder, murder case: Three arrested | सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पार्किंग वादातून खून, कोंढव्यातील घटना : तिघांना अटक

सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पार्किंग वादातून खून, कोंढव्यातील घटना : तिघांना अटक

googlenewsNext

पुणे/उंड्री : बंगल्यासमोर प्रवासी वाहतूक करणा-या गाड्या लावण्याच्या वादातून कोंढव्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला लोखंडी गजाने मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. लुल्लानगरमधील बंगला नंबर ६७ समोरील सार्वजनिक रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
नेवल बोेमी बत्तीवाला (वय ३१, रा़ सहानी सुजान पार्क, लुल्लानगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे़ याप्रकरणी श्रीगणेश जयवंतराव रासकर (वय ३१), योगेश दिनू कडवे (वय २२, दोघे रा़ मोहिते टॉवर, सहानी सुजान पार्क, लुल्लानगर) आणि विक्रम लक्ष्मण भोंबे (वय ३२, रा़ रासकर पॅलेसमागे, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़
याप्रकरणी हवालदार मुन्नीर इनामदार यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासकर, कडवे, भोंबे हे नेवल यांच्या बंगल्यासमोर प्रवासी वाहतूक करणा-या गाड्या लावायचे़ या कारणावरून यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते़ त्यांनी शुक्रवारी नेवल यांच्या बंगल्यासमोर गाडी लावली़
त्यामुळे नेवल यांनी विचारणा केली़ तेव्हा त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागात अधिकारी असल्याचे सांगितले़ त्यावर नेवल यांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले़ तेव्हा त्यांच्यात पुन्हा वाद झाला़ त्यानंतर तिघांनी नेवल यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली व दगड फेकून मारला़ गंभीर जखमी झालेले नेवल हे खाली पडल्याचे पाहिल्यावर ते पळून गेले़ नेवल यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले़ उपचारादरम्यान पहाटे त्यांचा मृत्यू झाला़ पोलिसांनी तिघांना अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक ए़ एस़ सोनावणे अधिक तपास करीत आहेत़

Web Title:  Software engineer's murder, murder case: Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.