शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

बलात्कारितेचाच खून होतो आहे : पुष्पा भावे; समाजवादी महिला संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 16:43 IST

फाशी दिली म्हणजे गुन्हे कमी होतील का? तर नाही यासाठी पुरूषी मानसिकताच बदलली गेली पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.

ठळक मुद्देमहिलांनी गांधीजींबरोबरही संघर्ष केला, ही लढाई समानतेची होती : पुष्पा भावे आज दाखविला जाणारा विकास म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार : मेधा पाटकर

पुणे :  आज संपूर्ण समाजात एक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोपर्डीची घटना घडण्यापूर्वी काय नगर जिल्ह्यामध्ये बलात्काराच्या घटना घडल्या नाहीत काय? त्यामुळे बलात्कारितेचाच एकप्रकारे खून होतो आहे. फाशी दिली म्हणजे गुन्हे कमी होतील का? तर नाही यासाठी पुरूषी मानसिकताच बदलली गेली पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.देशावरील फॅसिस्ट विचारधारेचे संकट आणि स्त्रीवादी चळवळीसमोर उभी ठाकलेली आव्हाने यापार्श्वभूमीवर विविध समाजवादी-पुरोगामी आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये एकजूट वाढावी आणि स्त्री चळवळी संदर्भात विचारमंथन व्हावे या उददेशाने ‘हम समाजवादी संस्थाएँ’च्या वतीने आयोजित ‘अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलना’च्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नर्मदा बचाओ आंदोलनाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मेधा पाटकर, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य तसेच सुनिती सु. र., डॉ. मनीषा गुप्ते, रझिया पटेल आदी उपस्थित होते.संघर्षाला ऐतिहासिकतेची एक किनार आहे असे सांगून पुष्पा भावे पुढे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून संघर्षाचा लढा सुरू आहे. केवळ तो एकाच रेषेत चालू राहिलेला नाही. काळानुरूप प्रश्न बदलले नसले तरी हा संघर्ष नवे चेहरे घेऊन समोर आला आहे. यात फुले-आगरकर यांचा संघर्ष अधिक महत्त्वाचा ठरतो कारण स्त्री-पुरूष समानतेच्या संघर्षातून एक मानवीय समानतेचा प्रश्न त्यांनी मांडला आहे. या संघर्षात मग तो लढा स्वातत्र्याचा का असेना महिलांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले आहे. लढा देताना सामाजिक कार्यही महिला करीत होत्या. महिलांनी गांधीजींबरोबरही संघर्ष केला. ही लढाई स्त्रीपुरूष विरूद्धची नव्हे तर समानतेची होती.आज डोक्याला फेटे बांधून बुलेटवर बसून बदलाची भाषा आपण करतो तेव्हा पुरूषांसारखेच व्हायचे ही विकृत वृत्ती येते. मानवीय प्रश्नांमध्ये काय भूमिका घेतो हे त्यांच्या लक्षातच येत नाही. या समानतेच्या गप्पा करताना अनेक प्रश्नांकडे आपण हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहोत. ज्यावेळी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा महिलांना सुधारायची, त्यांची मानसिकता बदलायची भाषा केली जाते. मात्र पुरूषी दृष्टी बदलायला हवी यावर कुणी परिश्रम घेत नाही. समाजात जसे लहानग्या मुलींवर अत्याचार होत आहेत तसा अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. बलात्कारितेचाच खून होतो आहे. महिलांवर जे बलात्कार होत आहेत ते जातीय तेढ किंवा महिलांविषयीच्या मत्सरबुद्धीमधून होत आहेत आणि या अत्याचारांना महिलांना सामोरे जावे लागत आहे, अशी भीषण स्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.मेधा पाटकर यांनी समाजातल्या विविध प्रश्नांवर महिलांनी दिलेल्या संघर्षांवर भाष्य केले. महिलांशिवाय कोणताही संघर्ष आणि परिवर्तन घडू शकत नाही. आज दाखविला जाणारा विकास म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार आहे. नदी आणि व्यक्तीला ‘विकास’ या नावाने संबोधित केले जात आहे. शेतक-यांची नाळ जमिनीशी तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. या विकासाचा परिणाम सर्वात जास्त महिला भोगत आहेत. तरीही त्या लढा देत आहेत. महिलांमुळेच संघर्षाची ताकद अधिक बळकट होत आहे याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले.भाई वैद्य यांनी पंतप्रधान पद हे मोदींना भागवंतांनी दिलेले बक्षीस आहे, दंगलीतील सहभागाबद्दल मोदींना हे बक्षीस मिळाले आहे, अशा शब्दात मोदींवर निशाणा साधला.   

टॅग्स :Puneपुणेkopardi caseकोपर्डी खटला