शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लढा कोरोनाशी! कुटुंबाने एकमेकांना धीर देत केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 17:57 IST

तुकाईदर्शन येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे यांच्या कुटुंबाबतील चारही सदस्यांनी हरवले कोरोनाला

ठळक मुद्दे एकमेकांना धीर देत, घाबरून न जाता खंबीरपणे सामना केला, तर कोणतेही संकट परतवून लावता येते

पुणे: पुण्यातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था, तरुणांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. जीवाची पर्वा न करता ही लोक गोरगरिबांचा आधार बनले आहेत. गरजूंची भूक भागवण्यासाठी सातत्याने अन्नदानाची मोहीम राबवत आहेत. अशाच प्रकारे सामाजिक क्षेत्रात काम करताना संतोष कांबळे यांना कधी कोरोनाची लागण झाली हे कळालेच नाही. समाजकार्य करताना ही व्यक्ती कुटुंबासहीतच कोरोनाच्या विळख्यात अडकली. पण संपूर्ण कुटुंबीयांनी न घाबरता एकमेकांना धीर देत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. 

पत्नी मनीषा, मुलगी ऋतुजा व मुलगा ओमराजे आणि संतोष कांबळे असे चार सदस्यांचे कुटुंब आहे.  कांबळे यांनी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बऱ्याच कुटुंबांना कोरोना काळातही मदत केली. परंतु दुर्दैवाने त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ पत्नी आणि दोन मुलं अशा सर्व कुटुंबाला कोरोनाने घेरले.

डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्वांनी गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना दररोज जास्तीत जास्त चांगला आहार दिला. त्यांनी स्वतःबरोबर कुटुंबीयांनाही त्याच पद्धतीने आहार आणि औषधे दिली. लवकरच कोरोनातून बरे व्हाल असा विश्वास डॉक्टरांनी दिला होता. संकटसमयी एकमेकाला धीर देऊन आधार देण्याची अत्यंत गरज आहे. उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत बरे वाटू लागले. असे कांबळे यांनी सांगितले.  त्यांचा समाजकार्यात सक्रिय सहभाग असल्याने यामध्ये त्यांना काही पोलिस अधिकारी, सहकारी मित्र यांचे सहकार्य लाभले.  

एकमेकांना धीर देत, घाबरून न जाता खंबीरपणे सामना केला, तर कोणतेही संकट परतवून लावता येते. कोरोना महामारीच्या आजारातून स्वतःबरोबर कुटुंबाला सावरले. कोरोना महामारीने जगाला विळखा घातला आहे. आरोग्याची कसलीही तक्रार वाटू लागली, तर लगेच डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. घाबरून जाऊ नका, सकारात्मक राहा, रक्ताच्या नात्यासह मित्र परिवाराला आधार द्या, आता ती गरज आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळा इतरांनाही पाळण्यासंबंधी प्रबोधन करा, ही तुमच्या-आमच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. स्वतःबरोबर इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे पालन करा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल