सामाजिक कार्य, विकासकामांनी विजय
By Admin | Updated: February 14, 2017 02:23 IST2017-02-14T02:23:59+5:302017-02-14T02:23:59+5:30
भाजपाच्या या चारही उमेदवारांनी केलेली समाजकार्ये व विकासकामे हेच या उमेदवाराला या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आणेल

सामाजिक कार्य, विकासकामांनी विजय
कात्रज : भाजपाच्या या चारही उमेदवारांनी केलेली समाजकार्ये व विकासकामे हेच या उमेदवाराला या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आणेल, असा विश्वास भाजपाचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ४०चे भाजपाचे अधिकृत उमेदवार अभिजित कदम, संदीप बेलदरे-पाटील, सुनीता लिपाणे-राजवाडे व स्वप्नाली महेश जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या भागाचा विकास करीत असताना अभिजित कदम यांनी केलेले दत्तनगर-संतोषनगर भागातील नागरिकांसाठी पाण्याचे नियोजन, भागातील कचरा जिरवण्यासाठी उभारलेला कचरा विघटन प्रकल्प, अभिजित पतंगराव कदम क्रीडासंकुल, ज्यामध्ये महिलासाठी स्वीमिंग पूल, जिम, योगा केंद्र आहे. तसेच शंकरराव राजाराम कदम क्रीडासंकुल, आंबेगाव पठारावरील विलासराव देशमुख उद्यान या भागातील रस्ते, ड्रेनेज, वीज अशी अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. केंद्रात व राज्यात असलेली भाजपाची सत्ता पुणे महापालिकेतदेखील येणार आहे. सर्वांगीण विकासासाठी व आपला प्रभाग स्मार्ट प्रभाग बनवण्यासाठी भाजपाच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
भाजपाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.