समाजकल्याण कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:33+5:302021-02-05T05:01:33+5:30
पुणे : समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी मागण्यांबाबत पुर्ततेचे आश्वासन दिल्यामुळे समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय लेखणी बंद आंदोलन स्थगित ...

समाजकल्याण कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
पुणे : समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी मागण्यांबाबत पुर्ततेचे आश्वासन दिल्यामुळे समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय लेखणी बंद आंदोलन स्थगित केले. संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची मुंबईत मुंडे यांच्याबरोबर गुरूवारी चर्चा झाली.
विविध मागण्यांसाठी समाजकल्याण कर्मचारी संघटनेने लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावरून मुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर गुरूवारी मुंबईत चर्चा केली. राज्य अध्यक्ष शांताराम शिंदे, तसेच राजेंद्र देवरे, राजेंद्र भुजाडे, राजेंद्र कांबळे, सुजित भांबुरे, भरत राऊत, कार्यकारणी सदस्य भूषण शेळके, विठ्ठल राव धसाडे, प्रफुल्ल गोहते, डॉक्टर त्रिवेणी लोहार, शासकीय निवासी शाळा प्रतिनिधी विष्णू दराडे, शिवराज गायकवाड उपस्थित होते.
मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यातील कंत्राटी पदे न भरणे, आहे त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे, रिक्त पदांवर त्वरीत भरती करणे या व अन्य मागण्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाºयांबरोबर पुन्हा चर्चा करण्यात येईल व शक्य आहे त्या मागण्यांना त्वरीत मंजूरी दिली जाईल असे मुंडे यांनी बैठकीत सांगितले. त्यानंतर राज्य अध्यक्ष शांताराम शिंदे यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.