बाप्पा का बर्थडे' म्हणत दिला सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST2021-02-15T04:11:02+5:302021-02-15T04:11:02+5:30

धायरी : गणेश जयंतीच्या निमित्ताने संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केक कापून गणपती बाप्पांचा वाढदिवस साजरा करण्यात ...

Social message saying 'Bappa ka birthday' | बाप्पा का बर्थडे' म्हणत दिला सामाजिक संदेश

बाप्पा का बर्थडे' म्हणत दिला सामाजिक संदेश

धायरी : गणेश जयंतीच्या निमित्ताने संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केक कापून गणपती बाप्पांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल जवळ घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास अनेक चिमुकल्यांनी हजेरी लावली. यावेळी गणपती बाप्पांच्या वेशभूषेत असणारा चिमुकला सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश गिरमे म्हणाले की, हल्लीचे तरुण 'भाई का बर्थडे' म्हणत धिंगाणा करीत वाढदिवस साजरा करीत असतात. मुलांना लहानपणापासून योग्य संस्कार मिळावेत म्हणून आम्ही सामाजिक संदेशाच्या माध्यमातून 'बाप्पा का बर्थडे' म्हणत वाढदिवस साध्या पध्दतीने तसेच शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमास राम तोरकडी, विजय कणसे, मंदार डबीर, निखिल भालेराव, गोरख ढवळे, लोकेश राठोड आदिजण उपस्थित होते.

फोटो : संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केक कापून गणपती बाप्पांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Web Title: Social message saying 'Bappa ka birthday'