शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रंगांची उधळण करीत बालचित्रकारांचा सामाजिक संदेश; सारसबागेत चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 13:59 IST

स्मार्ट सिटी, वाहतूक समस्या, रक्तदान श्रेष्ठदान, ग्राम स्वच्छता अभियान यांसारख्या सामाजिक विषयावर आपल्या कल्पनाशक्तीतून नाविण्यपूर्ण चित्रे कॅनव्हासवर रेखाटत बालचित्रकारांनी सामाजिक संदेश दिला.

ठळक मुद्दे१६७ शाळांतील सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी रेखाटली विविध विषयांवरील कल्पक चित्रेपारितोषिक वितरण राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे होणार ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता

पुणे : स्मार्ट सिटी, वाहतूक समस्या, रक्तदान श्रेष्ठदान, ग्राम स्वच्छता अभियान यांसारख्या सामाजिक विषयावर आपल्या कल्पनाशक्तीतून नाविण्यपूर्ण चित्रे कॅनव्हासवर रेखाटत बालचित्रकारांनी सामाजिक संदेश दिला. बालचित्रकारांसोबतच उपस्थित मान्यवरांनी देखील चक्क विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्र काढत त्यामध्ये रंग भरल्याचे दृश्यं पाहून उपस्थितांना देखील प्रोत्साहन मिळाले. राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १६७ शाळांतील सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित द. मि. कै. सि. धों. आबनावे कला महाविद्यालयातर्फे सारसबागेत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिल्पकार विवेक खटावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष व सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, प्रकाश आबनावे, दिलीप आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, पी. डी. आबनावे, डॉ. छाया आबनावे, कल्याणी साळुंखे, इंद्राणी रानडे, नीता गुमास्ते, चेतन आगरवाल, आयुब पठाण, प्रशांत वेलणकर, अविनाश अडसूळ, उमेश काची, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष आहे.विवेक खटावकर म्हणाले, चित्रकला स्पर्धांमधून भावी चित्रकार व शिल्पकारांची पिढी घडत असते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कोणाची ना कोणाची सेवा करायला हवी. मग ती देवाची, आई-वडिलांची, गुरुजनांची किंवा कलेची असो. जीवनामध्ये सेवेचे महत्त्वाचे स्थान आहे. लहान वयातच मुलांमध्ये सेवा आणि कर्तव्याची भावना रुजल्यास आयुष्यात पुढे ते अनावश्यक गोष्टींचा त्याग करुन गरजूंना मदतीचा हात देऊ शकतील. याकरीता पालकांनी मुलांना तशी शिकवण द्यायला हवी.

डॉ. विकास आबनावे म्हणाले, मराठीसह इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखील चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तब्बल ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके विज्येत्यांना देण्यात येणार आहेत. सामान्य मुलांसोबत दिव्यांग मुले आणि पालकांनीही मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला असून हे यंदाचे वैशिष्ट्य आहे, असेही त्यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे होणार आहे. इंद्राणी रानडे यांनी सूत्रसंचालन केले. रुची कुलकर्णी यांनी आभार मानले. 

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणे