... so we have to fight for OBC reservation; Minister Chhagan Bhujbal's warning | ...तर ओबीसी आरक्षणासाठी लढावेच लागेल; मंत्री छगन भुजबळांचा इशारा

...तर ओबीसी आरक्षणासाठी लढावेच लागेल; मंत्री छगन भुजबळांचा इशारा

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार असो की फडणवीस सरकार आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. मात्र मराठा समाजातील काही नेते म्हणतात की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे. अशा परिस्थितीत संघर्ष निर्माण होण्यासारखे वातावरण आहे. आपल्या आरक्षण हक्कांवर गदा येत असेल तर लढायला लागेल, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ... so we have to fight for OBC reservation; Minister Chhagan Bhujbal's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.