शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

...म्हणून पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करू नये : रामदास आठवले यांचा सल्ला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 16:40 IST

पंकजा या भाजपमध्येच राहतील यात शंका नाही : रामदास आठवले

पुणे : आम्ही कुणालाच घाबरत नाही, मी कुणाचा निरादार करत नाही. माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र आता केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे. 

रामदास आठवले हे पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.  

आठवले म्हणाले, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे आयुष्य भाजपमध्ये गेले. आणि पंकजा या गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र, चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करू नये. देशातील सर्व जाती धर्मांचा विचार करून मंत्री मंडळात नेत्यांना स्थान गेले आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचा नंबर लागला नाही. पंकजा या भाजपमध्येच राहतील यात शंका नाही.

आठवले पुढे म्हणाले,एल्गार परिषद व भिमा कोरेगाव दंगल याचा काहीही‌ संबंध नाही. एल्गार परिषदेतील भाषणांमुळे नक्षलवाद वाढू नये म्हणून संशयितांवर कारवाई सुरू आहे. जे आंबेडकरवादी आहेत; ते नक्षलवादी विचाराचे असू‌ शकत नाहीत.

यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला. आठवले म्हणाले, जबतक है केंद्र मे नरेंद्र मोदी, तब तक कैसे पंतप्रधान बनेंगे राहुल गांधी. 'जरी आली कोरोनाची तिसरी लाट, तर आम्ही लावू त्याची वाट..'; 'जे रोज देतात इतरांना टोले, त्यांना म्हणतात नाना पटोले' या कविता सादर केल्या.  

टॅग्स :PuneपुणेPankaja Mundeपंकजा मुंडेRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण