शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...तर मी ५ नगरसेवक निवडून आणू शकतो; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 14:39 IST

मी एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे

पुणे : औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरे यांनी जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाआरती, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे, अशी आंदोलने कार्यकर्त्यांनी सुरु ठेवली आहेत. तसेच काही भागात त्यांच्याकडून पोलिसांना निवेदनही दिले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आंदोलनांत सहभागी नसल्याने विविध चर्चाना उधाण आले होते. 

त्यावेळी मी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बालाजी दर्शनाला गेलो होतो. अक्षय्य तृतीयेनिमित्ताने हे नियोजन केले होते. त्यामुळे मला आंदोलनात सहभागी होता आले नाही. परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते. एखादा सैनिक नसेल तर लढाई हरत नाहीत. त्यामुळे जर माझ्या नसल्याने विविध चर्चा होत असतील. तरी मी अजूनही राजमार्गावरच आहे आणि राजमार्गावरच राहणार मतभेद असले तरी मनभेद नाहीत तेव्हा वसंत मोरे यांनी स्पष्ट केले होते. 

आज सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांची भेट घेतली. यावेळी वसंत मोरे आणि मनसेचे शिष्टमंडळ वेगळे असल्याचे दिसून आले. याबाबत मोरे यांना विचारले असता त्यानी एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे असे सांगितले आहे. तसेच माझ्याकडे शहराची जबाबदारी नसली तरी माझ्याकडे तीन प्रभागांची जबाबदारी दिली. तर त्यातून मी ५ नगरसेवक निवडून आणू शकतो. अशी तयारी वसंत मोरे यांनी दाखवली आहे.    

मोरे म्हणाले, राज ठाकरे विचारांचा अथांग महासागर आहे, त्याला अनेक नद्या नाले मिळतात. सगळे खळखळणारे आहेत. त्यापैकी मी एक खळखळणारा आहे. माझी वाट नेहमी वेगळीच असते. माझं ध्येय धोरण असत, पक्ष वाढवणे, जास्तीत जास्त जाग निवडून आणणे हे आहे. तीन प्रभागांमधून ९ नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक मनसेचे असतील अशी तयारी त्यांनी दाखवली आहे. शहराची जबाबदारी अध्यक्षांची आहे. त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही.  माझं २५ नगरसेवकांचे टार्गेट होते. माझ्या भागातील नगरसेवक कसे वाढतील याकडे लक्ष देतोय. माझा मार्ग राजमार्ग आहे.    

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMuncipal Corporationनगर पालिकाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण