शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

... तर मग स्वच्छता स्पर्धेत शहराचा क्रमांक शेवटून पहिला आला याचे आश्चर्य वाटायला नको : उपमहापौर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 12:17 IST

असेच काम स्वच्छतेचे होत असेल तर मग शहराचा क्रमांक स्पर्धेत शेवटून पहिला आला तर आश्चर्य वाटायला नको..

ठळक मुद्देसहायक आयुक्तांसमवेत केली पाहणी : करदात्यांच्या पैशांचा अपव्ययपालिकेच्या कामात शिस्त नाही. स्वच्छतेचे काम काळजीपूर्वक करणे गरजेचे

पुणे: उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मंगळवारी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्यासमवेत आपल्या प्रभागात फिरून त्यांना स्वच्छतेच्या कामातील अनेक त्रुटी दाखवल्या. असेच काम होत असेल तर मग शहराचा क्रमांक स्पर्धेत शेवटून पहिला आला तर आश्चर्य वाटायला नको अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मोळक यांनी नंतर सर्व क्षेत्रीय कार्यालयांना परिपत्रक पाठवून या त्रुटी त्वरीत दूर करण्याचे आदेश दिले.गेल्या काही महिन्यांपासून पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत स्पधेर्साठी ही तयारी सुरू आहे. मागील वेळी या स्पर्धेत पालिकेला फटका बसला होता. त्यामुळे यावेळी जय्यत तयारी सुरू आहे. उपमहापौर डॉ. धेंडे यांनी खुद्द मोळक यांनाच आपल्या येरवडा भागातील प्रभागामध्ये विविध गल्लीबोळ फिरून दाखवत काम कसे चालते याचे दर्शन घडवले. सरकारी वसाहतींमधील कचरा वेळेवर उचलला न जाणे, रस्त्यांची स्वच्छता काळजीपूर्वक होत नसल्याने दोन्ही बाजूंनी कचरा साचणे, रस्त्यांवर ठिकठिकाणी कचºयाचे ढिग दिसणे, मोकळ्या जागांवर सार्वजनिक ठिकाणी फेकलेला कचरा उचलला न जाणे अशा बºयाच गोष्टी या पाहणीमध्ये उपमहापौर व मोळक यांच्या निदर्शनास आल्या. काही ठिकाणी अपेक्षित असलेले कर्मचारीच उपस्थित नव्हते, काहीजण होते पण कामच करत नव्हते असेही त्यांना आढळले.त्याचबरोबर आरोग्य निरीक्षकांकडून रस्त्यावर कचरा करणाºयांवर काहीही कारवाई केली जात नाही. कार्यक्रमांमध्ये जेवणावळी घातल्या जातात व त्याचे खरकटे रस्त्यावर मोकळ्या जागांवर टाकले जाते, अशा वेळी संबधितांची भेट घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तर पुढील वेळी अशा गोष्टींना आळा बसेल, मात्र ही कारवाई होतच नाही असे डॉ. धेंडे यांनी सांगितले.मोळक यांनी या सगळ्याची दखल घेत फक्त येरवडाच नाही तर सर्वच क्षेत्रीय कार्यालयांसाठी एक परिपत्रक त्वरीत जारी केले. त्यात त्यांनी या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. तसेच कर्मचारी हजेरी, त्यांचे काम यांची कधीही अचानक तपासणी केली जाईल, कामात कुचराई दिसल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. रस्त्यावर कायमस्वरूपी पडून असलेल्या वाहनांबाबतही अतिक्रमण विरोधी विभागाशी संपर्क साधून या वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचना मोळक यांनी दिल्या आहेत. 

......

करदात्यांच्या पैशांचा अपव्ययपालिकेच्या कामात शिस्त नाही. स्वच्छतेचे काम काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे, कारण याचा सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याशी थेट संबध असतो. कर्मचाºयांना व त्यांच्यावर देखरेखीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या विषयाची गांभीर्य नाही. पालिका फक्त कचरा व्यवस्थापनावर कोट्यवधीचा खर्च करत असताना त्याचा काही उपयोग होत नसेल तर ते अयोग्य व करदात्यांच्या पैशांचा अपव्यय करणारे आहे.डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर,

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान