शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे अजित पवार यांची मानसिकता बिघडली; आमदार गोपीचंद पडळकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 17:46 IST

मुख्यमंत्री कमी बोलतात आणि बाजूचे लोकच जास्त बोलतात अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

बारामती: दिल्ली भेटीच्या वेळी नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंशी बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे अजित पवारांची मानसिकता बिघडली आहे. ते तणावात असल्यासारखे वाटत असल्याचा टोला आमदार गोपिचंद पडळकर यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी(दि १९) बारामती तालुक्यात विविध समाजातील प्रतिनिधींबरोबर घोंगडी बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवारांवर टीका केली.

पडळकर म्हणाले,अजित पवार यांना मी आवाहन करतो. बारामतीकरांनी मागील विधानसभेला माझे डिपॉझिट जप्त केले, हा विषय शिळा झाला. स्वत:च्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभेला दीड, दोन लाखाने पराभूत झाला. निवडणुकीआधी अवघ्या १५ दिवसांपूर्वी पक्षाने मला बारामतीतून लढण्यास सांगितले. पवार यांनी निवडणुकीच्या आधी १५ दिवस आधी फॉर्म भरून अजित पवारांच्यात हिम्मत असेल तर आटपाडीमधून स्थानिक नेत्यांचा पाठिंबा न घेता लढवावी. तर माझ्यासारखीच अवस्था त्यांची होईल.माझा पराभव त्याचवेळी मी मान्य केला आहे. त्याच विषयांवर पवार यांनी बोलु नये. ते तणावात असल्यासारखे वाटतात.मराठा, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण याविषयावर त्यांनी बोलावे.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे काही गोष्टी राजकारणात घडल्या. राज्य सरकारचंच सामाजिक सलोखा बिघडेल अस वर्तन सुरु  आहे.जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातुन  विविधमंत्रांच्या स्टेटमेंट मधून होत आहे.मराठा समाजाच आरक्षण रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत राज्य शासन गंभीर नाहि.ओबीसी राज़किय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने  स्थगिती दिली आहे.त्या ओबीसी ३४६  जातींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे पडळकर म्हणाले.

७ मे रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीने २००४ च्या पदोन्नतीच्या कायद्याला स्थगिती दिली. पदोन्नती विषयी आला तेव्हा काँग्रेसने राजीनाम्याची भूमिका घेतली,त्यांना मी आवाहन करत आहे. तुम्ही केलेली मागणी केली त्याला केराची टोपली दाखवली.

काका पुतण्यांच्या पुढं माना डोलावणे कमी कमी करा.सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची देखील राज्य सरकारने दखल घेतली नाही. महाराष्ट्रतील काँग्रेसचे मंत्री सत्तेपोटी लाचार झालेत, वसुलीचा जो हिस्सा मिळतोय त्यावर ते समाधानी आहेत. यांचं कुणी ऐकत नाही जर त्यांच्यात हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा.ओबीसी आरक्षण,पदोन्नती आरक्षण,मराठा आरक्षणावर त्यांनी मुग गिळुन बप्प बसु नये. सरकारमध्ये चर्चा नाही, समन्वय नाही. वसुलीसाठी, खाबुगिरीसाठी सरकार चालवितात. मुख्यमंत्री कमी बोलतात आणि बाजूचे लोक जास्त बोलतात अशी टीका पडळकर यांनी केली.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरPoliticsराजकारण