शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बेबी डायपरमधून स्मगलिंग...! ६०६ ग्रॅम सोने जप्त, लोहगाव विमानतळावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 4:13 PM

बेबी डायपरच्या प्रेस बटणामध्ये सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना २-३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा लावलेल्या आढळून आल्या़. त्याची बाजारातील किंमत सुमारे १८ लाख रुपये आहे.

ठळक मुद्देबेबी डायपरच्या प्रेस बटणामध्ये आढळून आल्या़ २-३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगादुबई व अबुधाबीहून येणाऱ्या विमानातून केली जात आहे़ सोन्याची तस्करी

पुणे : हवाईसुंदरी असलेल्या हेमा मालिनीला दर विमान प्रवासात एक बाहुली पोहोचविण्यासाठी दिली जाते़ त्यातून स्मगलिंग केले जात असते़ पण, त्याची काहीही कल्पना हेमा मालिनीला नसते़ अशीच घटना पुण्यातील लोहगाव विमानतळावर घडल्याचे आढळून आले आहे़ दुबईहून आलेल्या प्रवाशाकडे एकाने बेबी डायपर सोपविले होते़ रविवारी पहाटे दुबईहून स्पाईस जेटचे विमान आले़ या विमानातील प्रवाशाकडील बेबी डायपरविषयी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला़ त्यांनी त्याची तपासणी केल्यावर त्याच्या प्रेस बटणामध्ये २-३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा लावलेल्या आढळून आल्या़ त्यावर रेडियमचे प्लेटिंग करण्यात आले होते़ त्या प्रेस बटणांमध्ये एकूण ६०६ ग्रामचे सोने आणण्यात येत होते़ त्याची बाजारातील किंमत सुमारे १८ लाख रुपये असल्याचे सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले़ दुबई व अबुधाबीहून येणाऱ्या विमानातून प्रामुख्याने सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे़ त्यामुळे पुणे विमानतळावर येणाऱ्या या विमानांची आणि विमान प्रवाशांची कसून तपासणी केली जाते़ त्यातून आजवर अनेक तस्करीची घटना उघडकीस आल्या आहेत़ 

रेडियम प्लेटिंग करण्याकडे कलसोन्यावर रेडियम प्लेटिंग केले की स्कॅनिंगमध्ये आतील सोने दिसून येत नाही़ त्याच्यावर नंतर प्रक्रिया केल्यावर संपूर्णपणे सोने परत हाती लागते़ त्यामुळे तस्करी करताना वेगवेगळे माध्यम वापरतानाच त्यावर रेडियम प्लेटिंग करण्याकडे तस्करांचा कल दिसून येऊ लागला आहे.

टॅग्स :pune airportपुणे विमानतळGoldसोनं