गणवेश खरेदीत संशयाचा धूर

By Admin | Updated: April 24, 2015 03:42 IST2015-04-24T03:42:54+5:302015-04-24T03:42:54+5:30

: महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या गणवेशखरेदीसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून संशयाचा धूर येत आहे.

The smoke of doubt in the uniform of the uniform | गणवेश खरेदीत संशयाचा धूर

गणवेश खरेदीत संशयाचा धूर

पुणे : महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या गणवेशखरेदीसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून संशयाचा धूर येत आहे.
या गणवेशखरेदीत प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपनीपेक्षा त्याच कंपनीची एजन्सी असलेल्या कापड विक्रेत्याने कमी दराची निविदा सादर केली आहे. तर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंपनीने पुन्हा महापालिकेस पत्र पाठवून एजन्सीच्या दरानेच कापड देण्यास सहमती दर्शविली असून, त्यानुसार, प्रशासनाने कंपनीकडून खरेदी करण्याची शिफारस केली असून, त्याबाबतच्या खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव ठेवताना, ज्या ठेकेदारांनी निविदा भरल्या, त्यांनी महापालिकेस दिलेल्या दरांची कोणतीही माहिती या प्रस्तावात नमूद करण्यात आलेली नाही. तब्बल ५८ लाख रुपयांची ही कापड खरेदी आहे.
महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या ११ हजार विद्यार्थ्यांसाठी पालिकेकडून दरवर्षी गणवेश पुरविले जातात. हे गणवेश वेळेत मिळावेत यासाठी प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यात चार पुरवठादारांनी सहभाग घेतला होता. त्यातील महापालिकेकडून ज्या कंपनीचे कापड खरेदी करण्यात येणार आहे, त्या मफतलाल या कंपनीनेही निविदा सादर केली होती. मात्र, या निविदांवरून कोणत्या कंपनीने जादा दराने निविदा भरली हे स्पष्ट होत नव्हते. विशेष म्हणजे या पुरवठादाराकडे मफतलाल कंपनीच्या कापडाची एजन्सी आहे. त्यामुळे एजन्सीपेक्षा कंपनीने जादा दराने निविदा भरल्याचे स्पष्ट होते.

Web Title: The smoke of doubt in the uniform of the uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.