धनकवडी सहकारनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी स्मिता कोंढरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:16+5:302021-04-11T04:11:16+5:30
प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीची प्रक्रिया व्हिडीओ काँन्फरशनद्वारे करण्यात आली. या निवडणुकीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ...

धनकवडी सहकारनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी स्मिता कोंढरे
प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीची प्रक्रिया व्हिडीओ काँन्फरशनद्वारे करण्यात आली. या निवडणुकीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पीठासीन आधिकारी म्हणून काम पाहिले.
दक्षिण उपनगरांमधील विकास कामांना प्राधान्य देत असताना नागरिकांच्या नेमक्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. मागील चार वर्षांत नागरी हिताचे बहुतांश प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत.
कोट
अपूर्ण प्रकल्पाच्या पूर्ततेसह नव्या योजनांची अंमलबजावणी केली जाईल. सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरणाऱ्या पाणी प्रश्नाचे सुयोग्य आणि उत्तम नियोजन करत असतानाच, कचरा व वाहतूक कोंडी या सारखे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यांना प्राधान्य राहील. खासदार सुप्रिया सुळे व पक्षनेत्यातील वरिष्ठांशी चर्चा करून प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील.
- स्मिता कोंढरे, नवनियुक्त अध्यक्ष